यशया 38:18-20
यशया 38:18-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण अधोलोक तुझे आभार मानीत नाही. मृत्यू तुझी स्तुती करत नाही; जे खाली खोल खड्ड्यात जातात त्यांना तुझ्या सत्याची आशा नसते. जिवंत मनुष्य, जिवंत मनुष्य, तोच एक तुझे आभार मानेल, जसा मी आज करीत आहे; पित्याने मुलांना तुझ्या सत्याची जाणीव करून द्यावी. “परमेश्वर मला तारण्यास सिद्ध आहे आणि आम्ही आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात परमेश्वराच्या मंदिरात संगीतासह साजरा करू.”
यशया 38:18-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण अधोलोक तुमची स्तुती करू शकत नाही, मृत्यू तुमचे स्तुतिगान करू शकत नाही. जे खाली गर्तेत जातात ते तुमच्या विश्वासूपणाची आशा करू शकत नाहीत. जिवंत, जे जिवंत आहेत—ते तुमची स्तुती करतात, जसे मी आज करीत आहे; पालक त्यांच्या मुलांना तुमच्या विश्वासूपणाबद्दल सांगतात. याहवेह मला वाचवतील, आणि आपण याहवेहच्या मंदिरात आपल्या आयुष्याचे सर्व दिवस तंतुवाद्याच्या साहाय्याने गाणी गात राहू.
यशया 38:18-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अधोलोक तुझा धन्यवाद करीत नाही, मृत्यू तुझी स्तुती गात नाही; शवगर्तेत उतरलेले तुझ्या सत्याची अपेक्षा करीत नाहीत. जिवंत, जिवंत माणूसच तुझा धन्यवाद करतो तसा मी आज करीत आहे. बाप तुझे सत्य मुलास प्रकट करतो. परमेश्वर मला तारण्यास सिद्ध आहे; म्हणून आम्ही आपली तंतुवाद्ये वाजवू; ती सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात वाजवू.”