यशया 35:1-2
यशया 35:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
निर्जन आणि रुक्ष भूमी आनंदी होईल; आणि निर्जल आनंद देईल आणि कमळाप्रमाने बहरेल. ते विपुलतेने बहरेल आणि हर्ष व गायन करून आनंद करतील; त्यास लबानोनाचे वैभव, कर्मेल व शारोन याचे सौदर्य दिले जाईल; ते परमेश्वराचे गौरव, आमच्या देवाचे सौदर्य पाहतील.
यशया 35:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
वाळवंट आणि शुष्क भूमी आनंदित होईल; अरण्य हर्षोल्हास करेल आणि बहरून येईल. केशराच्या फुलाप्रमाणे, त्याच्या फुलोऱ्याचा स्फोट होईल; तो मोठा आनंद करेल आणि उल्हासाने ओरडेल. लबानोनचे गौरव, कर्मेल आणि शारोन यांचे वैभव त्याला दिले जाईल; ते याहवेहचे गौरव, आमच्या परमेश्वराची भव्यता पाहतील.
यशया 35:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अरण्य व रुक्ष भूमी ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल. ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील; लबानोनाची शोभा त्याला मिळेल; कर्मेल व शारोन ह्यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल; ती परमेश्वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील.