यशया 28:16-17
यशया 28:16-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यासाठी परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “पाहा, मी सियोनेत आधारशिला, पारखलेला धोंडा, कोपऱ्याचा मोलवान धोंडा, स्थीर पाया म्हणून घालतो. जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल, तो लाजवला जाणार नाही. मी न्याय मोजमापाची काठी, आणि नितीमत्ता हा ओळंबा असे करीन, तेव्हा गारपीट खोट्यांचे आश्रय झाडून टाकील, आणि पूराचे पाणी लपण्याच्या जागा झाकून टाकील.”
यशया 28:16-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी सीयोनमध्ये एक दगड ठेवतो, एक परीक्षा घेतलेला दगड, खात्रीपूर्वक पायासाठी मौल्यवान कोनशिला; त्यावर भिस्त ठेवणारा, कधीही भीतीने त्रस्त होत नाही. मी न्यायाला मापनदोरी आणि नीतिमत्वाला ओळंबा असे करेन. गारांनी तुमचा खोटेपणा, तुमचे आश्रयस्थान झाडून काढला जाईल, आणि पाणी तुमच्या लपण्याच्या जागेवर भरून वाहील.
यशया 28:16-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, सीयोनेत पायाचा दगड बसवणारा मी आहे; मी पारखलेला दगड आहे; ती पायाला योग्य अशी मजबूत व मोलवान कोनशिला आहे; ‘विश्वास ठेवणार्याची त्रेधा उडणार नाही.’ न्याय ही दोरी व नीतिमत्ता हा ओळंबा असे मी करीन; लबाडीचा आश्रय गारांनी वाहून जाईल, व दडण्याची जागा जलाचे ओघ बुडवून टाकतील.”