यशया 19:20-21
यशया 19:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ही मिसर देशात सेनाधीश परमेश्वराचे चिन्ह व साक्ष अशी होतील. कारण ते जुलूमामुळे परमेश्वराकडे जेव्हा आरोळी मारतील तेव्हा तो त्यांच्यासाठी एक तारणारा व संरक्षणकर्ता पाठवील, आणि तो त्यांना सोडवील. त्या काळी परमेश्वर मिसऱ्यांस ओळख करून देईल आणि मिसरी परमेश्वरास ओळखतील. ते यज्ञ व अर्पणासह उपासना करतील आणि बली अर्पण करतील. ते परमेश्वरास नवस करतील आणि तो पूर्ण करतील.
यशया 19:20-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इजिप्त देशामध्ये सर्वसमर्थ याहवेहसाठी ते एक चिन्ह आणि साक्ष असतील. जेव्हा ते त्यांच्या जुलमी लोकांमुळे याहवेहकडे धावा करतील, तेव्हा ते त्यांच्याकडे एक तारणारा आणि रक्षक पाठवतील आणि ते त्यांना सोडवतील. तेव्हा याहवेह स्वतःला इजिप्तच्या लोकांस प्रगट करतील आणि त्या दिवशी ते याहवेह यांना स्वीकारतील. यज्ञार्पणे आणि धान्यार्पणे यांच्यासहित ते आराधना करतील; ते याहवेहकडे शपथ वाहतील आणि त्याचे पालन करतील.
यशया 19:20-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ही मिसर देशात सेनाधीश परमेश्वराचे चिन्ह व साक्ष अशी होतील; आपणांवर जुलूम करणार्यांमुळे लोक परमेश्वराचा धावा करतील तेव्हा तो एक उद्धारक व कैवारी पाठवून त्यांना मुक्त करील. त्या दिवशी परमेश्वर मिसर्यांना आपली ओळख देईल व मिसरी परमेश्वराला ओळखतील; ते यज्ञ व बली अर्पून त्याची उपासना करतील; ते परमेश्वराला नवस करतील व तो फेडतील.