यशया 18:2
यशया 18:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो समुद्रातून, लव्हाळ्यांच्या पात्रातून जलावर वकील पाठवतो. शीघ्रगती दूतांनो, त्या उंच आणि मनमिळावू राष्ट्रांकडे, जे लोक भीतीपासून दूर व जवळ आहेत त्यांच्याकडे, जे बलवान व अजिंक्य राष्ट्र, ज्याची भूमी नद्यांनी विभागली आहे त्याच्याकडे जा
यशया 18:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो समुद्रमार्गाने पाण्यावरून पापिरस नौकांमधून दूतांना पाठवितो. जा, जलदगतीने जाणाऱ्या दूतांनो, धिप्पाड आणि तुळतुळीत त्वचेच्या लोकांकडे जा, त्यांची जबर असलेल्या दूरवरच्या लोकांकडे, विक्षिप्त भाषण करणारे आक्रमक राष्ट्र, ज्यांची भूमी नद्यांमुळे विभागली गेली आहे.
यशया 18:2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो पाण्यावर चालणार्या लव्हाळ्यांच्या नावांतून जलमार्गाने वकील पाठवतो. शीघ्रगती दूतांनो, त्या उंच बांध्याच्या व तुळतुळीत अंगाच्या राष्ट्रांकडे जा; ते लोक मुळापासूनच भयंकर आहेत. ते हुकूमत चालवणारे व पादाक्रांत करणारे राष्ट्र आहे; त्याची भूमी नद्यांनी विभागलेली आहे.