यशया 12:2-4
यशया 12:2-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पाहा, देव माझे तारण आहे; मी त्याजवर भाव ठेवीतो व भिणार नाही, कारण परमेश्वर, होय परमेश्वर माझे बल व गीत आहे. तो माझे तारण झाला आहे.” तुम्ही आनंदाने तारण कुपातून पाणी काढाल. त्या दिवशी तुम्ही म्हणाल, “परमेश्वरास धन्यवाद द्या व त्याच्या नावाचा धावा करा; लोकांमध्ये त्याची कृत्ये जाहीर करा; त्याचे नाम थोर आहे अशी घोषणा करा.
यशया 12:2-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
निश्चितच परमेश्वर माझे तारण आहेत; मी भरवसा ठेवेन आणि घाबरणार नाही. याहवेह, याहवेह स्वतः माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण आहेत; ते माझे तारण झाले आहेत.” तारणाच्या विहिरींतून तुम्ही आनंदाने पाणी काढाल. त्या दिवशी तुम्ही म्हणाल: “याहवेहची स्तुती करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी जे काही केले आहे ते राष्ट्रांमध्ये माहीत होऊ द्या, आणि असे घोषित करा की, त्यांचे नाव गौरवान्वित आहे.
यशया 12:2-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरतो, भीत नाही; कारण प्रभू परमेश्वर1 माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे.” तेव्हा तुम्ही तारणकूपातून उल्लासाने पाणी काढाल. त्या दिवशी तुम्ही म्हणाल : “परमेश्वराचा धन्यवाद करा, त्याच्या नामाचा जयघोष करा, राष्ट्रांमध्ये त्याची कृत्ये विदित करा; त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा.