YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 1:16-18 - Compare All Versions

यशया 1:16-18 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

स्वतःला धुवा, स्वच्छ करा; तुमची दुष्ट कृत्ये माझ्या नजरेपासून नाहीशी करा; वाईट करणे सोडा; चांगले करण्यास शिका; न्याय मिळवा, पीडितांची मदत करा, पितृहीनांना न्याय द्या, विधवांचे रक्षण करा. परमेश्वर म्हणतो, “आता या, व एकमेकांशी संवाद करून हे जाणून घ्या; जरी तुमची पातके लाखेसारखी लाल असली, तरीही ती बर्फाप्रमाणे शुभ्र होतील; जरी ती किरमिजी रंगासारखी लाल असली, तरी ती शुभ्र लोकरीसारखी होतील.

सामायिक करा
यशया 1 IRVMAR

यशया 1:16-18 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“धुऊन तुम्ही स्वतःला स्वच्छ करा. तुमची दुष्कृत्ये माझ्या दृष्टीबाहेर करा; वाईट कृत्ये करणे थांबवा. योग्य तेच करण्यास शिका; न्यायीपणाचा शोध घ्या. पीडितांचे संरक्षण करा. पितृहीनांच्या बाजूचे समर्थन करा; विधवांची बाजू मांडा. “या आता, आपण वाद मिटवू या,” असे याहवेह म्हणतात. “जरी तुमची पापे लाखेसारखी असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली, तरी ती लोकरीसारखी होतील.

सामायिक करा
यशया 1 MRCV

यशया 1:16-18 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आपणांस धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा; दुष्टपणा करण्याचे सोडून द्या; चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा;1 अनाथाचा न्याय करा; विधवेचा कैवार घ्या. परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.

सामायिक करा
यशया 1 MARVBSI