होशेय 6:1-7
होशेय 6:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आमचे तुकडे केले आहे, आता तोच आम्हास बरे करील, त्याने जखम केली, तोच आम्हास पट्टी बांधेल. दोन दिवसानंतर तो आम्हास पुन्हा जिवंत करेल, तिसऱ्या दिवशी उचलून उभे करेल, आणि आम्ही त्याच्या समोर जिवंत राहू. चला आपण परमेश्वरास ओळखू या, प्रयत्नाने त्याचे ज्ञान मिळवूया, तो खचित पहाटे सारखा उदय पावणार आहे, भूमीवर पाऊस पडतो, त्याप्रमाणे तो आमच्याकडे येणार आहे.” एफ्राईमा मी तुला काय करु? यहूदा मी तुला काय करु? तुमचा विश्वासू पहाटेच्या ढगाप्रमाणे, आणि उडून जाणाऱ्या दवाप्रमाणे आहे. म्हणून मी माझ्या संदेष्ट्याद्वारे त्यांचे तुकडे केले आहे, माझ्या तोंडाच्या शब्दाने त्यांना ठार केले आहे. तुझा न्याय हा प्रकाशाप्रमाणे चमकत आहे. कारण मी बलिदान नाही तर विश्वासूपण इच्छितो, मला होमबली पेक्षा देवाचे ज्ञान प्रिय आहे. आदामाप्रमाणे त्यांनी करार मोडला, ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले.
होशेय 6:1-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“चला, आपण याहवेहकडे परत जाऊ. त्यांनी आम्हाला फाडले आहे, व तेच आम्हाला बरे करतील; त्यांनी आम्हाला जखम केली आहे, व आता तेच पट्टी बांधतील. ते आम्हाला दोन दिवसात पुनरुज्जीवन देतील; तिसर्या दिवशी ते आम्हाला पुनर्स्थापित करतील, जेणेकरून आपण त्यांच्या उपस्थितीत जिवंत राहू शकू. चला, याहवेहचा आपण स्वीकार करू या; चला, त्यांचा स्वीकार करण्यास आपण झटू या. सूर्याचे उगविणे जसे निश्चित आहे, तसेच त्यांचे प्रकट होणे निश्चित आहे; हिवाळ्यातील पावसाप्रमाणे, पृथ्वीला सिंचन घालणाऱ्या वसंतऋतूप्रमाणे ते आमच्याकडे येतील.” “एफ्राईमा मी तुमचे काय करू? यहूदाह मी तुमचे काय करू? कारण तुमची प्रीती सकाळच्या ढगांप्रमाणे, पहाटेच्या दवबिंदूप्रमाणे नाहीशी होते. म्हणून माझ्या संदेष्ट्याद्वारे मी तुमचे तुकडे केले आहे, माझ्या मुखाच्या शब्दांनी तुम्हाला ठार केले— तेव्हा माझ्या न्याय सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे पुढे वाढत जातो. कारण मला तुमची अर्पणे नव्हे, तर दया हवी आहे, आणि होमार्पण पेक्षा परमेश्वराचे ज्ञान प्रिय आहे. आदामाप्रमाणे तुम्ही माझा करार मोडला आहे; तिथे ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले होते.
होशेय 6:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हांला फाडले आहे, व तोच आम्हांला बरे करील; त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील. तो दोन दिवसांत आमचे पुनरुज्जीवन करील; तिसर्या दिवशी तो आम्हांला उठवून उभे करील; आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू. चला, आपण परमेश्वरास ओळखू; परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू; त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे; तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणार्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आमच्याकडे येईल.” हे एफ्राइमा, मी तुला काय करू? हे यहूदा, मी तुला काय करू? तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उडून जाणार्या दहिवराप्रमाणे आहे. म्हणून मी त्यांच्यावर संदेष्ट्याच्या हातून कुर्हाड चालवली आहे, माझ्या तोंडच्या शब्दांनी त्यांना ठार केले आहे; माझा न्याय प्रकाशाप्रमाणे व्यक्त झाला आहे. मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे; होमार्पणांपेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते. त्यांनी मनुष्याप्रमाणे1 करार मोडला आहे; तेथे ते माझ्याबरोबर बेइमानपणे वागले आहेत.