होशेय 6:1-3
होशेय 6:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आमचे तुकडे केले आहे, आता तोच आम्हास बरे करील, त्याने जखम केली, तोच आम्हास पट्टी बांधेल. दोन दिवसानंतर तो आम्हास पुन्हा जिवंत करेल, तिसऱ्या दिवशी उचलून उभे करेल, आणि आम्ही त्याच्या समोर जिवंत राहू. चला आपण परमेश्वरास ओळखू या, प्रयत्नाने त्याचे ज्ञान मिळवूया, तो खचित पहाटे सारखा उदय पावणार आहे, भूमीवर पाऊस पडतो, त्याप्रमाणे तो आमच्याकडे येणार आहे.”
होशेय 6:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“चला, आपण याहवेहकडे परत जाऊ. त्यांनी आम्हाला फाडले आहे, व तेच आम्हाला बरे करतील; त्यांनी आम्हाला जखम केली आहे, व आता तेच पट्टी बांधतील. ते आम्हाला दोन दिवसात पुनरुज्जीवन देतील; तिसर्या दिवशी ते आम्हाला पुनर्स्थापित करतील, जेणेकरून आपण त्यांच्या उपस्थितीत जिवंत राहू शकू. चला, याहवेहचा आपण स्वीकार करू या; चला, त्यांचा स्वीकार करण्यास आपण झटू या. सूर्याचे उगविणे जसे निश्चित आहे, तसेच त्यांचे प्रकट होणे निश्चित आहे; हिवाळ्यातील पावसाप्रमाणे, पृथ्वीला सिंचन घालणाऱ्या वसंतऋतूप्रमाणे ते आमच्याकडे येतील.”
होशेय 6:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हांला फाडले आहे, व तोच आम्हांला बरे करील; त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील. तो दोन दिवसांत आमचे पुनरुज्जीवन करील; तिसर्या दिवशी तो आम्हांला उठवून उभे करील; आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू. चला, आपण परमेश्वरास ओळखू; परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू; त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे; तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणार्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आमच्याकडे येईल.”