होशेय 11:1-3
होशेय 11:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा इस्राएल बालक होता तेव्हा त्यावर प्रेम केले, आणि माझ्या पुत्राला मिसरातून बोलावले. त्यांना जेवढे बोलविले तेवढे ते माझ्यापासून दूर जात ते बआलास बली आणि मुर्तीस धूप जाळत. तरी तो मीच ज्याने एफ्राईमास चालणे शिकविले तो मीच ज्याने त्यास हात धरुन उभे केले पण त्यांना माहीत नव्हते की मी त्यांची काळजी घेत होतो.
होशेय 11:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“इस्राएल जेव्हा लहान मूल होते तेव्हा मी त्याच्यावर प्रीती केली, आणि इजिप्तमधून माझ्या पुत्राला बोलाविले. पण त्यांना जितके जास्त बोलाविले, तितके ते माझ्यापासून दूर गेले. त्यांनी बआलापुढे बळी दिले आणि त्यांनी मूर्तीला धूप जाळला. मी तोच होतो ज्याने एफ्राईमला चालण्यास शिकविले, मी त्यांना कडेवर वागवले; तो मीच होतो ज्याने त्यांना आरोग्य दिले, परंतु हे त्यांना समजले नाही.
होशेय 11:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इस्राएल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली; मी त्याला आपला पुत्र म्हणून मिसरातून बोलावले. जो जो मी बोलावी, तो तो ते माझ्यापासून दूर जात; ते बआलमूर्तींना बली अर्पण करत, कोरीव मूर्तीपुढे धूप जाळत. मीच एफ्राइमाला चालायला शिकवले, मी त्यांना आपल्या कवेत वागवले आणि मी त्यांना बरे केले, पण ते त्यांना ठाऊक नाही.