होशेय 1:2-3
होशेय 1:2-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हा परमेश्वराचा होशेयला आलेला पहिलाच संदेश होता, तो होशेयला म्हणाला, “जा एका वेश्येसोबत लग्न कर व जी मुले होतील ती तिच्या जारकर्माचे परिणाम असतील कारण परमेश्वराचा त्याग करणे हे जारकर्म हा देश करीत आहे.” म्हणून होशेयने ने दिब्लाइमाची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केले. ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला.
होशेय 1:2-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा याहवेहने प्रथम होशेयद्वारे बोलण्यास प्रारंभ केला, तेव्हा याहवेह त्याला म्हणाले, “जा आणि एखाद्या व्यभिचारी स्त्रीबरोबर विवाह कर आणि तिच्यापासून लेकरे जन्माला घाल. कारण हा देश एका व्यभिचारी पत्नीप्रमाणे याहवेहशी अविश्वासूपणाचा दोषी आहे.” म्हणून त्याने दिब्लाइमाची कन्या गोमेर हिच्याशी विवाह केला आणि ती गरोदर राहिली. तिने त्याच्या पुत्राला जन्म दिला.
होशेय 1:2-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर होशेयाबरोबर प्रथम बोलला तेव्हा तो त्याला म्हणाला, “जा, एक जारिणी बायको करून घे व जारकर्माची मुले आपली अशी करून घे; कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जारकर्म हा देश करीत आहे.” मग त्याने जाऊन दिब्लाइमाची कन्या गोमर ही बायको करून घेतली; ती त्याच्यापासून गर्भवती होऊन तिला पुत्र झाला.