इब्री 7:16-17
इब्री 7:16-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मानवी नियमशास्त्राच्या हुकूमाने त्यास याजक करण्यात आले नव्हते तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याच्या आधारे त्यास याजक करण्यात आले. कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी शास्त्रवचन साक्ष देते “तू मलकीसदेकासारखा युगानुयुगासाठी याजक आहेस.”
इब्री 7:16-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते पूर्वजांच्या नियमानुसार नव्हे, तर ज्या जीवनाचा अंत होऊ शकत नाही अशा जीवनापासून वाहणार्या सामर्थ्याच्या आधारावर याजक झाले; हे असे जाहीर करते: “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहेस.”
इब्री 7:15-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि दैहिक आज्ञेच्या नियमाने नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा ‘मलकीसदेकासारखा’ निराळा ‘याजक’ जर उद्भवला आहे, तर ह्यावरून आम्ही सांगितले ते अधिकच स्पष्ट होते. त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, “तू मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुग याजक आहेस.”
इब्री 7:15-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मानवी नियम निर्बंधांनी नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा मलकीसदेकसारखा निराळा याजक जर उद्भवला आहे, तर ह्यावरून आम्ही सांगितले ते अधिकच स्पष्ट होते. त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, तू मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगे याजक असशील.