इब्री 6:1-3
इब्री 6:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबीसंबंधी बोलत राहण्याचे सोडून देऊ व प्रौढतेप्रत जाऊ. पुन्हा एकदा देवावरचा विश्वास, निर्जीव गतजीवनाचा पश्चात्ताप, बाप्तिस्म्यांचे, डोक्यावर हात ठेवण्याचे, मृतांचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक न्यायनिवाडा शिकवण, या मूलभूत गोष्टींचा पाया आपण पुन्हा घालू नये. देव होऊ देईल तर हे आपण करू.
इब्री 6:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन व्यर्थ प्रथांबद्धल पश्चात्ताप आणि परमेश्वरावरील विश्वास यात परिपक्व होऊ या. शुद्धतेच्या प्रथांबाबत, बाप्तिस्म्यांविषयी, डोक्यावर हात ठेवणे, मृतांचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक न्याय अशा विषयांचा पाया पुन्हा घालू नका. आणि परमेश्वर परवानगी देतील, तर आपण तसे करू.
इब्री 6:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चात्ताप, देवावरचा विश्वास, आणि बाप्तिस्म्यांचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण, हा पाया पुन्हा न घालता, आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू या. देव होऊ देईल तर हे आपण करू.
इब्री 6:1-3 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपण ख्रिस्ती संदेशाच्या प्राथमिक गोष्टींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत प्रगती करण्याचा नेटाने प्रयत्न करू या. निरुपयोगी कृत्यांपासून परावृत्त होणे व देवावर श्रद्धा ठेवणे, बाप्तिस्मे, डोक्यावर हात ठेवणे, मृतांचे पुनरुत्थान व शाश्वत न्यायनिवाडा ह्या गोष्टींविषयीच्या शिक्षणाचा पाया आपण पुन्हा घालू नये. आपण पुढे जाऊ या. परमेश्वर होऊ देईल तर हे आपण करू या.