इब्री 5:11-14
इब्री 5:11-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
याविषयी सांगण्यासारखे पुष्कळ आहे, पण तुम्हास ते स्पष्ट करणे कठीण आहे कारण तुम्ही ऐकण्यात खूप मंद झाला आहात. आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते, तरी देवाच्या शिक्षणाचे प्राथमिक धडे पुन्हा तुम्हास कोणीतरी शिकविण्याची गरज आहे. तुम्हास दुधाची गरज आहे, जड अन्नाची नाही असे तुम्ही झाला आहात. कारण जो कोणी अजून दुधावरच राहतो तो नीतिमत्त्वाच्या वचनाशी पोक्त नाही कारण अजून तो बाळच आहे. परंतु ज्यांच्या ज्ञानेद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट पारख करण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.
इब्री 5:11-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याबाबतीत आम्हाला खूप सांगावेसे वाटते, परंतु हे तुम्हाला स्पष्ट करून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. वास्तविक आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होते, पण त्याऐवजी कोणीतरी तुम्हालाच परमेश्वराच्या वचनांची मूलतत्वे परत शिकविण्याची गरज आहे. तुम्हाला दूध हवे, जड अन्न नव्हे! आणि जो कोणी दुधावर जगतो तो अजून तान्हेबाळ आहे आणि तान्हेबाळ असल्यामुळे नीतिमत्वाच्या शिक्षणाविषयी अपरिचित आहे. परंतु जड अन्नाचे सेवन परिपक्वांसाठी असते, जे सतत योग्य व अयोग्य यामधील फरक समजण्याचा सराव करून स्वतःला प्रशिक्षित करतात.
इब्री 5:11-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्याविषयी आम्हांला पुष्कळ सांगायचे आहे; ते तुम्हांला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता, पण तुम्हांला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची गरज आहे. आणि तुम्हांला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही, असे तुम्ही झाला आहात. कारण दुधावर राहणारा नीतिमत्त्वाच्या वचनाशी अपरिचित असतो; कारण तो बालक आहे; पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.
इब्री 5:11-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्याविषयी आम्हांला पुष्कळ सांगायाचे आहे, ते तुम्हांला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. वास्तविक एवढ्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होते, पण तुम्हांला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकविण्याची जरुरी आहे आणि तुम्हांला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही. दुधावर राहणारा नीतिमत्त्वाच्या वचनाशी अपरिचित असतो; कारण तो बालक असतो. पण ज्यांना विवेकदृष्टीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे, अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.