YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 4:1-3

इब्री 4:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

म्हणून देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी देवापासून मिळालेले अभिवचन अजूनही आहे आणि यास्तव तुमच्यापैकी कोणीही ते चुकवू नये म्हणून काळजी घ्या. कारण आम्हास सुद्धा सुवार्ता सांगितली गेली आहे ज्याप्रमाणे ती इस्राएल लोकांस सांगण्यात आली होती. परंतु जो संदेश त्यांनी ऐकला त्यापासून त्यांना फायदा झाला नाही कारण तो संदेश त्यांनी ऐकला पण त्यांनी विश्वासाने स्वीकारला नाही. ज्या आपण विश्वास ठेवला ते पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. असे देवाने म्हणले आहे. “म्हणून मी माझ्या रागाच्या भरात अशी शपथ वाहून म्हणालो, ‘ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत” जगाच्या निर्मितीपासूनचे त्याचे काम संपलेले होते तरी तो असे म्हणाला.

सामायिक करा
इब्री 4 वाचा

इब्री 4:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यास्तव, ज्याअर्थी त्यांच्या विसाव्यात प्रवेश करण्याचे अभिवचन अद्यापि कायम आहे, त्याअर्थी तुमच्यातील कोणीही उणा पडू नये म्हणून काळजी घ्या. कारण ही शुभवार्ता जशी त्यांना तशी आपल्यालाही सांगितली होती; पण जो संदेश त्यांनी ऐकला त्यामुळे त्यांचे काहीही भले झाले नाही, कारण ज्यांनी आज्ञापालन केले त्यांच्या विश्वासात ते सहभागी झाले नाहीत. ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनाच विसाव्यात जाता येते, जसे परमेश्वराने म्हटले, “मी रागाने शपथ घेतली की, ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.” जरी जगाच्या स्थापनेपासून परमेश्वर त्यांना स्वीकारावयास सिद्ध आहेत व त्यांची वाट पाहत आहेत.

सामायिक करा
इब्री 4 वाचा

इब्री 4:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे; ह्यामुळे तुमच्यातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिऊन वागू. कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही; कारण त्याचा ऐकणार्‍यांमध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. त्याची ‘कृत्ये’ जगाच्या स्थापनेपासून समाप्त झाली. तथापि, “त्याप्रमाणे मी रागाने शपथ वाहून म्हणालो, ‘हे माझ्या विसाव्यात निश्‍चित येणार नाहीत;”’ असे ज्या ‘विसाव्याविषयी,’ त्याने सांगितलेले आहे त्यात, ज्या आपण विश्वास ठेवला आहे ते ‘आपण प्रवेश करत आहोत.’

सामायिक करा
इब्री 4 वाचा

इब्री 4:1-3 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ज्या विसाव्याविषयी देव बोलला, त्याच्याविषयीचे अभिवचन त्याने आपल्याला देऊन ठेवलेले आहे; कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण काळजी घेऊ या; कारण त्यांच्यासारखे आपल्यालाही शुभवर्तमान सांगण्यात आले आहे. परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही; कारण त्यांनी ते श्रद्धेने स्वीकारले नाही. मात्र आपण श्रद्धावंत लोक परमेश्वराने वचन दिलेल्या विसाव्यात प्रवेश करीत आहोत. हे त्याच्या शब्दाप्रमाणेच घडत आहे: मी माझ्या क्रोधाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. जरी जगाच्या निर्मितीनंतर त्याचे कार्य पूर्ण झाले होते, तरीही तो हे म्हणाला.

सामायिक करा
इब्री 4 वाचा