इब्री 13:20-21
इब्री 13:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकाळच्या नव्या कराराद्वारे उठवले. त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हास चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यास संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्यास सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
इब्री 13:20-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता ज्या शांतीच्या परमेश्वराने, सार्वकालिक कराराच्या रक्ताने, आपले प्रभू येशू, जे मेंढरांचे महान मेंढपाळ आहेत, यांना मेलेल्यातून माघारी आणले, ते परमेश्वर त्यांच्या दृष्टीने जे योग्य ते आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताद्वारे करोत व प्रत्येक कामात त्यांना संतोषविण्यास तुम्हाला सिद्ध करो. त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
इब्री 13:20-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आता ज्या शांतीच्या देवाने ‘सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा’ महान ‘मेंढपाळ’ आपला प्रभू येशू, ह्याला मेलेल्यांतून ‘परत आणले,’ तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणांमध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हांला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो; त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन.
इब्री 13:20-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आता ज्या शांतिदात्या देवाने शाश्वत कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ह्याला मेलेल्यांतून उठविले, तो देव त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याकरिता आवश्यक अशा सर्व चांगल्या गोष्टी तुम्हांला पुरवो व त्याला जे आवडते, ते तो येशू ख्रिस्ताद्वारे आपणामध्ये घडवून आणो. ख्रिस्ताचा युगानुयुगे गौरव असो. आमेन.