इब्री 11:8-9
इब्री 11:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा परमेश्वराने त्याला वारसाचे अभिवचन दिलेल्या देशात जाण्यास सांगितले, तेव्हा अब्राहामाने आपण कुठे जात आहोत हे माहीत नसतानाही विश्वासाने आज्ञापालन केले. तो विश्वासाने त्या वचनदत्त देशात पोहोचला, तरीही तिथे एखाद्या परदेशी उपर्यासारखा तंबूतच राहिला. तसेच इसहाक व याकोब, ज्यांना परमेश्वराने हेच वारसाचे अभिवचन दिले होते, तेही पुढे तसेच तंबूत राहिले.
इब्री 11:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
विश्वासाने, अब्राहामाने, त्यास जे ठिकाण वतन मिळणार होते तिकडे जाण्यास त्यास बोलवण्यात आले तेव्हा आज्ञा मानली. तो कोठे जाणार होता हे त्यास माहीत नसताना तो निघाला. विश्वासाने, तो वचनदत्त देशात, जणू परदेशात प्रवासी म्हणून राहिला; आणि त्याच वतनात त्याचे जोडीचे वारीस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर तो डेर्यात वस्ती होती.
इब्री 11:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा परमेश्वराने त्याला वारसाचे अभिवचन दिलेल्या देशात जाण्यास सांगितले, तेव्हा अब्राहामाने आपण कुठे जात आहोत हे माहीत नसतानाही विश्वासाने आज्ञापालन केले. तो विश्वासाने त्या वचनदत्त देशात पोहोचला, तरीही तिथे एखाद्या परदेशी उपर्यासारखा तंबूतच राहिला. तसेच इसहाक व याकोब, ज्यांना परमेश्वराने हेच वारसाचे अभिवचन दिले होते, तेही पुढे तसेच तंबूत राहिले.
इब्री 11:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अब्राहामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे ‘निघून जाण्यास’ तो विश्वासाने मान्य झाला; आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही ‘तो निघून गेला.’ परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने ‘जाऊन राहिला;’ त्याच वचनाचे सहभागी वारस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेर्यात त्याची वस्ती होती.
इब्री 11:8-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अब्राहामला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते, तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने तयार झाला; आणि आपण कोठे जातो, हे ठाऊक नसताही तो निघाला. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला; त्याच वचनाचे सहभागी वारस म्हणून इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेऱ्यात त्यांची वसती होती