इब्री 11:4
इब्री 11:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
विश्वासाने, हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगले बलिदान देवाला अर्पण केले; त्याद्वारे तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली कारण देवाने त्याच्या अर्पणाविषयी साक्ष दिली आणि त्याद्वारे तो मरण पावला असताही अजूनही बोलतो.
इब्री 11:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
विश्वासाद्वारे हाबेलाने काईनापेक्षा उत्तम अर्पण परमेश्वराकडे आणले. परमेश्वराने त्याची प्रशंसा करून त्याला नीतिमान गणले, आणि हाबेल जरी मरण पावला आहे, तरी विश्वासाद्वारे तो आजही बोलतो.
इब्री 11:4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
विश्वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष ‘देवाने दानाच्या वेळी’ दिली; आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे.
इब्री 11:4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
विश्वासाने हाबेलने काइनपेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पण केला, त्यावरून तो नीतिमान आहे, अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने त्याची दाने स्वीकारून दिली आणि तो निधन पावला असला, तरी त्याच्या विश्वासाद्वारे तो अजूनपर्यंत बोलत आहे.