इब्री 10:20-21
इब्री 10:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याने पडद्यामधून म्हणजे आपल्या स्वतःच्या देहातून, आपल्यासाठी ती नवीन व जिवंत वाट स्थापित केली आहे. कारण देवाच्या घरावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे.
इब्री 10:20-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपल्यासाठी हा नवा व जीवनदायी मार्ग पडद्याद्वारे म्हणजे त्यांच्या शरीराद्वारे उघडला आहे. आणि आपल्यासाठी परमेश्वराच्या घरावर एक महान याजक आहेत
इब्री 10:19-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे; आणि आपल्याकरता ‘देवाच्या घरावर एक थोर याजक आहे
इब्री 10:19-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
म्हणून, बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व शाश्वत जीवनाकडे नेणारा मार्ग आपल्यासाठी स्थापन केला त्या मार्गाने पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य लाभले आहे. आपल्याकरिता देवाच्या मंदिराचा प्रमुख असा एक थोर याजक देण्यात आलेला आहे