हाग्गय 1:1-2
हाग्गय 1:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पारसाचा राजा दारयावेश राजा याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या, सहाव्या महिन्याच्या, पहिल्या दिवशी, शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल यहूदाचा राज्यपाल व यहोसादाकचा मुलगा यहोशवा, मुख्य याजक याच्याकडे हाग्गय संदेष्ट्याद्वारे परमेश्वराचे वचन आले, ते असे, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “हे लोक म्हणतात, की आमची येण्याची अजून वेळ आली नाही, किंवा परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही.”
हाग्गय 1:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी, सहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन हाग्गय संदेष्ट्याला यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, व प्रमुख याजक, यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ यांना उद्देशून आला: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “हे लोक म्हणतात, ‘याहवेहच्या भवनाच्या पुनर्बांधणीची योग्य वेळ अजून आलेली नाही.’ ”
हाग्गय 1:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी, सहाव्या महिन्याच्या प्रतिपदेस यहूदाचा प्रांताधिकारी शल्तीएल ह्याचा पुत्र जरूब्बाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा ह्यांना हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे : सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही.”