हबक्कूक 3:3-4
हबक्कूक 3:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देव तेमानाहून येत आहे, पवित्र प्रभू पारानाच्या पर्वतावरून येत आहे.(सेला) त्याचा प्रकाश आकाश व्यापतो; त्याच्या स्तवनांनी पृथ्वी भरली आहे. त्याचे तेज प्रकाशासारखे आहे; त्याच्या हातांतून किरण निघत आहेत; त्याचा पराक्रम तेथे गुप्त आहे.
हबक्कूक 3:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेमानाहून देव येत आहे, पारान पर्वतावरून पवित्र परमेश्वर येत आहे, सेला. परमेश्वराचे वैभव स्वर्ग झाकते, आणि त्याच्या स्तुतीने पृथ्वी भरली. त्याच्या हातातली किरणे प्रकाशासारखी चमकत होते आणि परमेश्वराने तेथे त्याचे सामर्थ्य ठेवले आहे.
हबक्कूक 3:3-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वर तेमान वरून आले, परमपवित्र पारान पर्वतावरून आले. सेला त्याच्या गौरवाने आकाश व्यापून गेले आहे व पृथ्वी त्याच्या स्तुतीने भरून गेली आहे. त्यांचे तेज सूर्योदयेसारखे होते; किरणे त्यांच्या हातांतून चकाकत बाहेर निघत होती, जिथे त्यांचे सामर्थ्य लपलेले होते.