YouVersion लोगो
सर्च आयकॉन

हबक्कूक 1:1-3 - Compare All Versions

हबक्कूक 1:1-3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हबक्कूक संदेष्ट्याला दृष्टान्ताने प्राप्त झालेले देववचन : हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू? तू ऐकत नाहीस. “जुलूम झाला” असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करत नाहीस. मला अधर्म का पाहायला लावतोस? विपत्ती मला का दाखवतोस? लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत; कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे.

सामायिक करा
हबक्कूक 1 MARVBSI

हबक्कूक 1:1-3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

संदेष्टा हबक्कूक याला मिळालेले देववचन. “हे परमेश्वरा, मदतीसाठी मी किती वेळ आरोळी मारू, आणि तू ऐकणार नाहीस? जाचजुलमात व भयात मी तुला आरोळी मारली, पण तू मला वाचवत नाहीस! तू मला अन्याय व अनर्थ का पाहायला लावतोस? नाश आणि हिंसा माझ्यासमोर आहेत; आणि भांडण व वाद उठतो!

सामायिक करा
हबक्कूक 1 IRVMAR

हबक्कूक 1:1-3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

संदेष्टा हबक्कूकला प्राप्त झालेली ही भविष्यवाणी आहे: हे याहवेह, मी कुठवर तुमचा धावा करावा? पण तुम्ही ऐकत नाहीत? मी तुम्हाला ओरडून हाक मारतो, “हिंसा!” पण तुम्ही वाचवित नाहीत. तुम्ही मला अन्यायाकडे का पहायला लावता? तुम्ही चुकीचे कार्य का सहन करता? विनाश आणि हिंसाचार माझ्यापुढे होत आहे; वाद व कलह वाढत आहेत.

सामायिक करा
हबक्कूक 1 MRCV