उत्पत्ती 9:4-5
उत्पत्ती 9:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण ज्यामध्ये त्याचे जीवन म्हणजे रक्त आहे, ते मांस तुम्ही खाऊ नये. परंतु तुमच्या रक्तासाठी, जे रक्त तुमचे जीवन आहे, त्याबद्दल मी आवश्यक भरपाई घेईन. प्रत्येक प्राण्याच्या हातून मी ती घेईन. मनुष्याच्या हातून, म्हणजे ज्याने आपल्या भावाचा खून केला आहे त्याच्या हातून, त्या मनुष्याच्या जिवाबद्दल मी भरपाईची मागणी करीन.
उत्पत्ती 9:4-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“परंतु ज्या मांसामध्ये जीवनदायी रक्त आहे, असे मांस तू खाऊ नकोस आणि मी तुझ्या जीवनदायी रक्ताचा जाब निश्चितच मागेन. जो कोणी एखाद्या मनुष्याचा वध करेल, त्या प्रत्येक पशूकडून मी जीवनाचा जाब घेणार. प्रत्येक मनुष्याकडून दुसर्या मनुष्याच्या वधाचा मी जाब घेणार.
उत्पत्ती 9:4-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तथापि मांसाचे जीवन रक्त आहे म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका. मी तुमच्या रक्ताबद्दल म्हणजे तुमच्या जिवाबद्दल झडती घेईन; प्रत्येक पशूची व मनुष्याची झडती घेईन; प्रत्येक मनुष्याची त्याच्या भावाच्या जिवाबद्दल झडती घेईन.