उत्पत्ती 6:5-7
उत्पत्ती 6:5-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पृथ्वीवर मानवजातीची दुष्टता मोठी आहे, आणि त्यांच्या मनात येणाऱ्या विचारातील प्रत्येक कल्पना केवळ एकसारखी वाईट असते, असे परमेश्वराने पाहिले. म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वरास वाईट वाटले, आणि तो मनात फार दुःखी झाला. म्हणून परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वीतलावरून नष्ट करीन; तसेच मनुष्य, पशू, सरपटणारे प्राणी, व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन, कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दुःख होत आहे.”
उत्पत्ती 6:5-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पृथ्वीवर मानवामध्ये दुष्टाई खूप वाढलेली आहे आणि त्यांचे विचार आणि कल्पना या सतत दुष्टाईच्याच असतात हे याहवेहने पाहिले. आपण मनुष्य निर्माण केल्याचा याहवेहला पश्चात्ताप झाला आणि त्यांच्या हृदयाला अतोनात वेदना झाल्या. म्हणून याहवेह म्हणाले, “मी निर्माण केलेल्या मानवजातीला पृथ्वीतलावरून नष्ट करेन—त्यांच्यासह पशू, सरपटणारे प्राणी, आकाशातील पक्षी यांनाही नष्ट करेन—कारण त्यांना निर्माण केल्याचा मला पश्चात्ताप होत आहे.”
उत्पत्ती 6:5-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणार्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले; म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करीन; मानव, पशू, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन; कारण त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे.”