उत्पत्ती 49:24-25
उत्पत्ती 49:24-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तरी त्याचे धनुष्य मजबूत राहील, आणि त्याचे बाहु कुशल होतील याकोबाचा सामर्थ्यवान देव, मेंढपाळ, इस्राएलाचा खडक याजकडून त्याच्या हातांना शक्ती मिळते. कारण तुझ्या बापाचा देव, जो तुला मदत करील, आणि सर्वशक्तिमान देवामुळे, जो तुला वरून आकाशाचे आशीर्वाद, खाली खोल दरीचे आशीर्वाद देवो, तसेच स्तनांचा व गर्भाशयांच्या उपजांचा आशीर्वाद तो तुला देवो.
उत्पत्ती 49:24-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु त्याचे धनुष्य स्थिर राहिले, त्याचे बाहू मजबूत राहिले, याचे कारण याकोबाचे सर्वसमर्थ परमेश्वर, ते मेंढपाळ आणि इस्राएलचे खडक आहेत. कारण तुझ्या पित्याचे परमेश्वर, तुझे सहायक आहेत, कारण सर्वसमर्थ, जे तुला आशीर्वादित करतात, वरून स्वर्गातील आशीर्वाद, खोलातील डोहातून निघणार्या झर्यातील आशीर्वाद, स्तने आणि गर्भांच्या आशीर्वादांचा वर्षाव करो.
उत्पत्ती 49:24-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तथापि त्याचे धनुष्य मजबूत राहिले; याकोबाचा समर्थ देव, मेंढपाळ, इस्राएलाचा खडक ह्याच्या नावाने त्याचे भुज स्फुरण पावले. तुझे साहाय्य करणारा तुझ्या पित्याचा देव, तुला वरदान देणारा सर्वसमर्थ देव ह्याच्याकडून हे होईल. वरून आकाशाची व खालून जलाशयाची वरदाने तो तुला देईल, अंगावर पिणार्यांची व पोटच्या फळांची वरदाने तो तुला देईल.