YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 41:1-16

उत्पत्ती 41:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

साधारणपणे दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर फारो राजाला स्वप्न पडले. ते असे की, पाहा तो नाईल नदीच्या काठी उभा राहिला होता. तेव्हा पाहा, त्याने सात गाई नाईल नदीतून बाहेर येताना पाहिल्या. त्या धुष्टपुष्ट व सुंदर होत्या. त्या तेथे उभ्या राहून गवतात चरत होत्या. त्यानंतर आणखी सात दुबळ्या व कुरुप गाई नदीतून बाहेर आल्या व नदीच्या किनारी त्या सात धष्टपुष्ट व सुंदर गाईंच्या बाजूला उभ्या राहिल्या. आणि त्या सात दुबळ्या व कुरुप गाईंनी त्या सात सुंदर व धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. त्यानंतर फारो राजा जागा झाला. मग फारो राजा पुन्हा झोपल्यावर त्यास दुसऱ्यांदा स्वप्न पडले. त्यामध्ये त्याने पाहिले की, एकाच ताटाला सात भरदार कणसे आली. त्यानंतर पाहा, त्या ताटाला सात खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी सात कणसे आली. नंतर त्या सात खुरटलेल्या व करपलेल्या कणसांनी ती सात चांगली व टपोऱ्या दाण्यांची भरदार कणसे गिळून टाकली. तेव्हा फारो पुन्हा जागा झाला आणि ते तर स्वप्न असल्याचे त्यास समजले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नांमुळे चिंतेत पडून बेचैन झाला. त्याने मिसर देशातील जादूगार व ज्ञान्यांना बोलावले. फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाच त्या स्वप्नांचा अर्थ सांगता आला नाही. तेव्हा प्यालेबरदार फारोस म्हणाला, “आज मला माझ्या अपराधाची आठवण होत आहे. फारो, आपण माझ्यावर व आचाऱ्यावर संतापला होता आणि आपण आम्हांस पहारेकऱ्यांच्या सरदाराच्या वाड्यातील तुरुंगात टाकले होते. तेव्हा तुरुंगात असताना एकाच रात्री मला व त्याला, आम्हा दोघांना स्वप्ने पडली. आम्हांला लागू होतील अशी निरनिराळी स्वप्ने आम्हांला पडली. तेथे कोणी इब्री तरुण आमच्याबरोबर कैदेत होता. तो संरक्षण दलाच्या सरदाराचा दास होता. त्यास आम्ही आमची स्वप्ने सांगितली त्याने त्याचे स्पष्टीकरण केले. त्याने आमच्या प्रत्येकाच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला. आणि त्याने सांगितलेल्या अर्थाप्रमाणे तसे ते घडले. तो म्हणाला, फारो तुला पूर्वीप्रमाणे कामावर पुन्हा घेईल आणि परंतु दुसऱ्याला फाशी देईल.” मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले. तेव्हा त्यांनी त्यास ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करून व कपडे बदलून फारोकडे आला. मग फारो योसेफास म्हणाला, “मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की, जेव्हा कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू स्वप्नांचा अर्थ सांगतोस.” योसेफाने फारोला उत्तर देऊन म्हणाला, “तसे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. देवच फारोला स्वप्नांचा अर्थ सांगेल.”

सामायिक करा
उत्पत्ती 41 वाचा

उत्पत्ती 41:1-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर, एके रात्री फारोहला स्वप्न पडले. तो नाईल नदीच्या काठावर उभा होता. तेवढ्यात एकाएकी नाईल नदीतून चांगल्या धष्टपुष्ट दिसणार्‍या सात गाई वर आल्या आणि लव्हाळ्यात चरू लागल्या. नंतर नाईलमधून दुसर्‍या सात गाई आल्या; त्या अगदी कुरूप व दुबळ्या होत्या आणि नदीकाठी असलेल्या गाईंच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. मग त्या सात दुबळ्या गाईंनी त्या धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. यावर फारोहची झोपमोड झाली. यानंतर तो पुन्हा झोपी गेला आणि त्याला पुन्हा दुसरे स्वप्न पडले: एकाच ताटाला टपोर्‍या दाण्यांची भरदार सात कणसे त्याने पाहिली. मग आणखी सात कणसे उगवली, पण ही वाळून गेलेली आणि पूर्वेच्या वार्‍याने कोमेजून गेलेली होती. या सात अशक्त कणसांनी टपोर्‍या दाण्यांची ती भरदार कणसे गिळून टाकली. नंतर फारोह जागा झाला आणि हे सर्व स्वप्न होते हे त्याला समजले. दुसर्‍या दिवशी सकाळी, स्वप्नांचा विचार करता फारोह चिंताक्रांत झाला. मग त्याने इजिप्तमधील सर्व ज्योतिष्यांना व ज्ञानी पुरुषांना बोलाविले आणि त्यांना आपले स्वप्न सांगितले. परंतु त्यापैकी एकालाही त्या स्वप्नाचा अर्थ काय असेल हे सांगता येईना. मुख्य प्यालेबरदार फारोहला म्हणाला, “आज मला माझ्या चुकीची आठवण होत आहे. काही काळापूर्वी फारोह माझ्यावर आणि प्रमुख रोटी भाजणार्‍यावर रागावून त्यांनी आम्हाला सुरक्षादलाच्या अधिकार्‍याच्या घरातील बंदिवासात ठेवले होते. त्यावेळी प्रमुख रोटी भाजणार्‍याला आणि मला एकाच रात्री स्वप्ने पडली, दोन्ही स्वप्नांचा अर्थ वेगळा होता. त्या ठिकाणी एक इब्री तरुण होता; तो सुरक्षादलाच्या अधिकार्‍याचा गुलाम होता. त्याला आम्ही आमची स्वप्ने सांगितली आणि त्याने आम्हाला आमच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला, त्याने प्रत्येकाच्या स्वप्नानुसार त्याच्या अर्थ सांगितला. आणि त्याने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडली: प्यालेबरदाराच्या जागी माझी पुन्हा नेमणूक झाली आणि प्रमुख रोटी भाजणार्‍याला फाशी देण्यात आली.” तेव्हा फारोहने योसेफाला बोलाविणे पाठविले. योसेफाला लगेच तुरुंगाच्या कोठडीतून बाहेर आणण्यात आले आणि योसेफ मुंडण करून व कपडे बदलून फारोहपुढे दाखल झाला. फारोह योसेफास म्हणाला, “मला एक स्वप्न पडले, पण येथे असलेल्या कोणाही मनुष्याला त्याचा अर्थ काय असेल हे सांगता येत नाही. पण मी असे ऐकले आहे की तू स्वप्न ऐकताच, तुला स्वप्नांचा अर्थ सांगता येतो.” योसेफाने उत्तर दिले, “मला स्वतःच्या बुद्धीने स्वप्नांचा अर्थ सांगता येत नाही, परंतु परमेश्वर फारोहला हितकारक उत्तर देतील.”

सामायिक करा
उत्पत्ती 41 वाचा

उत्पत्ती 41:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

पुरी दोन वर्षे लोटल्यावर फारोला स्वप्न पडले की आपण नील नदीच्या काठी उभे असताना सात सुंदर व धष्टपुष्ट गाई नदीतून बाहेर निघून लव्हाळ्यात चरू लागल्या. पुढे पाहतो तर त्यांच्यामागून कुरूप व दुबळ्या अशा आणखी सात गाई नदीतून निघाल्या आणि त्या पहिल्या गाईंजवळ नदीकाठी उभ्या राहिल्या. तेव्हा कुरूप व दुबळ्या गाईंनी त्या सुंदर व धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. त्यानंतर फारो जागा झाला. मग तो पुन: झोपी गेला असता त्याला दुसर्‍यांदा स्वप्न पडले की, एकाच ताटाला सात चांगली भरदार कणसे आली; आणि पाहा, त्यांच्यामागून खुरटलेली व पूर्वेच्या वार्‍याने करपलेली अशी सात कणसे निघाली. त्या खुरटलेल्या कणसांनी ती सात चांगली भरदार कणसे गिळून टाकली. मग फारो जागा झाला आणि पाहतो तर ते स्वप्न होते. सकाळी फारोचे चित्त अस्वस्थ झाले, आणि त्याने मिसर देशातील अवघे ज्योतिषी व पंडित ह्यांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली, पण फारोला त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता. तेव्हा प्यालेबरदारांचा नायक फारोला म्हणाला, “माझ्या अपराधांची आज मला आठवण होत आहे. फारोची आपल्या सेवकांवर इतराजी झाली तेव्हा त्याने मला व आचार्‍यांच्या नायकाला गारद्यांच्या सरदाराच्या वाड्यात कैदेत ठेवले होते. तेव्हा एकाच रात्री आम्हा दोघांना, मला व त्याला लागू पडतील अशा अर्थाची स्वप्ने पडली; तेथे त्या गारद्यांच्या सरदाराचा दास कोणी इब्री तरुण पुरुष आमच्याबरोबर होता, त्याला आम्ही आपापली स्वप्ने सांगितली व त्याने त्यांचा अर्थ आम्हांला सांगितला; त्याने प्रत्येकाच्या स्वप्नानुसार अर्थ सांगितला. त्याने आम्हांला अर्थ सांगितला तसेच घडून आले; मला आपल्या हुद्द्यावर पूर्ववत रुजू केले आणि त्याला फाशी दिले.” मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले, तेव्हा त्याला तत्क्षणी बंदिखान्यातून बाहेर आणले; आणि तो आपले मुंडन करून व वस्त्रे बदलून फारोपुढे आला. फारो योसेफाला म्हणाला, “मी एक स्वप्न पाहिले, त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की, तू स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतोस?” योसेफ फारोला म्हणाला, “मी कोण सांगणारा? फारोला शांती देणारे उत्तर देवच देईल.”

सामायिक करा
उत्पत्ती 41 वाचा