YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 37:2-4

उत्पत्ती 37:2-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

याकोबासंबंधीच्या घटना या आहेत. योसेफ सतरा वर्षांचा तरुण होता. आपल्या भावांबरोबर तो कळप सांभाळीत असे. तो आपल्या वडिलाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा यांच्या मुलांबरोबर होता. त्या भावांनी केलेल्या वाईट गोष्टीविषयी त्याने आपल्या बापाला सांगितले. इस्राएल सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने योसेफाला एक सुंदर पायघोळ झगा बनवून दिला होता. आपला बाप आपल्या इतर भावांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतो हे त्याच्या भावांना दिसले म्हणून ते त्याचा द्वेष करीत आणि त्याच्याशी प्रेमाने बोलत नसत.

सामायिक करा
उत्पत्ती 37 वाचा

उत्पत्ती 37:2-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याकोबाच्या कुटुंबाचा वृतांत असा आहे: योसेफ सतरा वर्षांचा तरुण असताना आपल्या भावांबरोबर, त्याच्या वडिलांच्या पत्नी बिल्हा व जिल्पा यांच्या पुत्रांबरोबर कळप चारीत असे, तेव्हा योसेफाने, त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल तक्रारी वडिलांकडे आणल्या. इस्राएल योसेफावर आपल्या इतर मुलांपेक्षा अधिक प्रीती करीत असे, कारण त्याला तो म्हातारपणी झाला होता; म्हणून याकोबाने त्याच्यासाठी एक आकर्षक रंगाचा अंगरखा तयार केला. जेव्हा त्याच्या भावांनी पाहिले की त्यांचे वडील त्यांच्यापेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतात, तेव्हा ते योसेफाचा द्वेष करू लागले आणि त्याच्याशी सलोख्याचा एकही शब्द बोलू शकत नव्हते.

सामायिक करा
उत्पत्ती 37 वाचा

उत्पत्ती 37:2-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

याकोब वंशाचा वृत्तान्त1 हा : योसेफ सतरा वर्षांचा असताना आपल्या भावांबरोबर कळप चारत असे; तो आपल्या बापाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा ह्यांच्या मुलांबरोबर असे; तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापाला दिली. इस्राएल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता; त्याने त्याच्यासाठी पायघोळ झगा केला होता. आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले.

सामायिक करा
उत्पत्ती 37 वाचा