उत्पत्ती 25:1-10 - Compare All Versions
उत्पत्ती 25:1-10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अब्राहामाने दुसरी बायको केली, तिचे नाव कटूरा. तिला त्याच्यापासून जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह हे मुलगे झाले. यक्षानास शबा व ददान हे झाले; आणि ददानाचे मुलगे अश्शूरी, लटूशी व लऊमी हे होते. मिद्यानाचे मुलगे एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे होते. हा सर्व कटूरेचा वंश. अब्राहामाने आपले सर्वस्व इसहाकाला दिले. पण अब्राहामाच्या उपपत्नी होत्या. त्यांच्या मुलांना त्याने देणग्या देऊन आपल्या हयातीतच आपला मुलगा इसहाक ह्याच्यापासून वेगळे करून पूर्वेकडे पूर्वदेशी लावून दिले. अब्राहामाच्या आयुष्याची वर्षे एकशे पंचाहत्तर होती. अब्राहाम पुर्या वयाचा चांगला म्हातारा होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. मग त्याचे मुलगे इसहाक व इश्माएल ह्यांनी त्याला एफ्रोन बिन सोहर हित्ती ह्याच्या मम्रेसमोरील शेतातल्या मकपेलाच्या गुहेत पुरले. हे शेत अब्राहामाने हेथींपासून विकत घेतले होते, आणि तेथेच अब्राहाम व त्याची बायको सारा ह्यांना पुरले.
उत्पत्ती 25:1-10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अब्राहामाने दुसरी पत्नी केली; तिचे नाव कटूरा होते. तिच्यापासून त्यास जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह ही मुले झाली. यक्षानास शबा व ददान झाले. अश्शूरी, लटूशी व लऊमी लोक हे ददानाचे वंशज होते. एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व कटूरेचे वंशज होते. अब्राहामाने आपले सर्वस्व इसहाकास दिले. अब्राहामाने आपल्या उपपत्नीच्या मुलांना देणग्या दिल्या, आणि आपण जिवंत असतानाच त्याने आपला मुलगा इसहाकापासून त्यांना वेगळे करून दूर पूर्वेकडील देशात पाठवून दिले. अब्राहामाच्या आयुष्याच्या वर्षाचे दिवस हे इतके आहेत, तो एकशे पंच्याहत्तर वर्षे जगला. अब्राहामाने शेवटचा श्वास घेतला आणि तो वृद्ध होऊन व पूर्ण जीवन जगून चांगल्या म्हातारपणी मेला व आपल्या लोकांस जाऊन मिळाला. इसहाक व इश्माएल या त्याच्या मुलांनी त्यास सोहर हित्ती याचा मुलगा एफ्रोन याचे शेत मम्रेसमोर आहे त्यातल्या मकपेला गुहेत पुरले. हे शेत अब्राहामाने हेथीच्या मुलाकडून विकत घेतले होते. त्याची पत्नी सारा हिच्याबरोबर तेथे अब्राहामाला पुरले.
उत्पत्ती 25:1-10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अब्राहामाने दुसरी पत्नी केली होती, तिचे नाव केटूराह होते. तिच्यापासून त्याला जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह पुत्र झाले. योक्षान हा शबा आणि ददान यांचा पिता; अश्शूरी, लटूशी आणि लऊमी हे ददानाचे गोत्र होते. एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व केटूराहचे वंशज होते. अब्राहामाने आपली सर्व मालमत्ता इसहाकाच्या नावावर केली. परंतु अब्राहाम जिवंत असताना त्याने आपल्या दासीपुत्रांनाही देणग्या दिल्या आणि त्याने त्यांना इसहाकापासून दूर, पूर्वेकडे पाठवून दिले. अब्राहाम एकशे पंचाहत्तर वर्षे जगला. मग अब्राहामाने अखेरचा श्वास घेतला आणि एका वृद्धावस्थेत, परिपूर्ण वयाचा होऊन मरण पावला; आणि मग तो त्याच्या लोकांना जाऊन मिळाला. त्याची मुले इसहाक आणि इश्माएल यांनी त्याला मम्रेजवळील मकपेलाच्या गुहेत, जोहर हिथीचा मुलगा एफ्रोनच्या शेतात पुरले, हे अब्राहामाने हेथच्या लोकांकडून विकत घेतलेले शेत. तिथे अब्राहामाला त्याची पत्नी साराहजवळ मूठमाती देण्यात आली.