उत्पत्ती 24:36-38
उत्पत्ती 24:36-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सारा, ही माझ्या धन्याची पत्नी वृद्ध झाली तेव्हा तिच्यापासून माझ्या धन्याला मुलगा झाला, आणि त्यास त्याने आपले सर्वकाही दिले आहे. माझ्या धन्याने माझ्याकडून वचन घेतले, तो म्हणाला, ‘ज्यांच्या राज्यात मी माझे घर केले आहे त्या कनानी लोकांतून माझ्या मुलासाठी कोणी मुलगी पत्नी करून घेऊ नकोस. त्याऐवजी माझ्या वडिलाच्या परिवाराकडे जा, आणि माझ्या नातलगांकडे जा व तेथून माझ्या मुलासाठी तू पत्नी मिळवून आण.’
उत्पत्ती 24:36-38 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या धन्याला त्याची पत्नी साराह हिच्यापासून वृद्धापकाळात एक पुत्र झाला. माझ्या धन्याने त्याचे सर्वस्व त्याला दिले आहे. त्या पुत्रासाठी, मी जिथे राहत आहे तेथील स्थानिक कनानी मुलींमधून पत्नी निवडू नये, असे वचन माझ्या धन्याने माझ्यापासून घेतले आहे. माझ्या वडिलांच्या कुटुंबात जावे आणि माझ्या स्वतःच्या घराण्यातील लोकांकडे जाऊन माझ्या मुलासाठी येथील मुलगी निवडून मी आणावी, असे त्याने मला बजावले आहे.
उत्पत्ती 24:36-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्या धन्याची बायको सारा हिला वृद्धापकाळी त्याच्यापासून मुलगा झाला, त्याला त्याने आपले सर्वस्व दिले आहे. आणि माझ्या धन्याने मला शपथ घ्यायला लावून सांगितले आहे की, ज्या कनान्यांच्या देशात मी राहत आहे त्यांच्या मुलींतली नवरी माझ्या मुलासाठी पाहू नकोस; तर माझ्या बापाच्या घरी माझ्या आप्तांकडे जा आणि तेथून माझ्या मुलासाठी नवरी पाहून आण.