उत्पत्ती 18:6-8
उत्पत्ती 18:6-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अब्राहाम पटकन तंबूत सारेकडे गेला आणि म्हणाला, “लवकर तीन मापे सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.” नंतर अब्राहाम गुरांच्या कळपाकडे पळत गेला आणि त्यातून त्याने कोवळे आणि चांगले वासरू घेतले आणि सेवकाजवळ देऊन त्याने त्यास ते लवकर तयार करण्यास सांगितले. त्याने तयार केलेले वासरू, तसेच दूध व लोणी त्यांच्यापुढे खाण्यासाठी ठेवले आणि ते जेवत असता तो झाडाखाली त्यांच्याजवळ उभा राहिला.
उत्पत्ती 18:6-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग अब्राहाम धावत आपल्या तंबूत येऊन साराहला म्हणाला, “लवकर तीन सिआ सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.” नंतर अब्राहाम आपल्या गुरांच्या कळपाकडे गेला, त्यातील एक कोवळे व उत्तम वासरू त्याने निवडले आणि ते लवकर बनवावे म्हणून एका नोकराकडे दिले. मग त्याने दूध, दही आणि वासराचे मांस घेतले, जे त्याने बनविले होते आणि ते त्यांच्यासमोर ठेवले; आणि ते जेवत असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला.
उत्पत्ती 18:6-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा अब्राहाम त्वरेने डेर्यात सारेकडे जाऊन म्हणाला, “तीन मापे सपीठ लवकर घे व ते मळून त्याच्या भाकरी कर.” अब्राहाम गुरांकडे धावत गेला व त्याने एक चांगले कोवळे वासरू निवडून चाकराकडे दिले; त्याने ते त्वरेने रांधले. नंतर अब्राहामाने दही, दूध व ते रांधलेले वासरू आणून त्याच्यापुढे ठेवले आणि ते जेवत असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला.