YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 14:14-16

उत्पत्ती 14:14-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

लोटाला कैद करून नेल्याचे अब्रामाला समजल्याबरोबर त्याने आपल्या कुटुंबात जन्मलेल्या तीनशेअठरा प्रशिक्षित पुरुषांना बरोबर घेतले आणि घरी परतणार्‍या विजयी सैन्याचा थेट दानपर्यंत पाठलाग केला. रात्रीच्या वेळी अब्रामाने युद्ध करण्यासाठी आपले सैन्य विभागले आणि त्याने या सैन्यावर यशस्वी हल्ला केला आणि त्याच्यापुढून पळून जाणार्‍या सैन्याचा त्याने दिमिष्काच्या उत्तरेकडे असलेल्या होबाह या शहरापर्यंत पाठलाग केला. त्याने सर्व मालमत्ता तसेच आपला पुतण्या लोट, याची मालमत्ता, स्त्रिया आणि कैद करून पळविलेले लोटचे इतर लोकही परत मिळविले.

सामायिक करा
उत्पत्ती 14 वाचा