उत्पत्ती 11:7-9
उत्पत्ती 11:7-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकू. मग त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.” मग परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली आणि म्हणून नगर बांधण्याचे काम त्यांनी थांबवले. त्यामुळे त्या ठिकाणाचे नाव बाबेल पडले, कारण तेथे परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला आणि परमेश्वराने त्यांना तेथून सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले.
उत्पत्ती 11:7-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
चला, आपण खाली जाऊ आणि त्यांच्या भाषेत वेगवेगळ्या भाषांची सरमिसळ करू, म्हणजे त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.” अशा रीतीने याहवेहने सर्व पृथ्वीभर मानवांची पांगापांग केली आणि त्यांचे शहर बांधण्याचे काम थांबले. म्हणून त्या शहराला बाबिलोन म्हणतात, कारण याहवेहने मानवांना गोंधळात पाडून अनेक भाषा दिल्या आणि सर्व पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली.
उत्पत्ती 11:7-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर चला, आपण खाली जाऊन ह्यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे ह्यांना एकमेकांची भाषा समजणार नाही.” नंतर परमेश्वराने तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले; ह्याप्रमाणे त्यांचे नगर बांधायचे राहिले. म्हणून त्या नगराचे नाव ‘बाबेल’ असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले.