उत्पत्ती 1:11-13
उत्पत्ती 1:11-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देव बोलला, “हिरवळ, बीज देणाऱ्या वनस्पती, आणि आपआपल्या जातीप्रमाणे, ज्यात त्याचे बीज आहे अशी फळे देणारी फळझाडे, ही पृथ्वीवर येवोत.” आणि तसेच झाले. पृथ्वीने हिरवळ, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उत्पन्न केली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा तिसरा दिवस.
उत्पत्ती 1:11-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग परमेश्वराने म्हटले, “भूमीतून वनस्पतीचा उपज होवो: निरनिराळी रोपे व झाडे, फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणार्या फळझाडांचा भूमीतून उपज होवो” आणि तसे घडून आले. भूमीने वनस्पतीचा उपज केला: फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उपजविली. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा तिसरा दिवस.
उत्पत्ती 1:11-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा देव बोलला, “हिरवळ, बीज देणारी वनस्पती आणि आपापल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो;” आणि तसे झाले. हिरवळ, आपापल्यापरी बीज देणारी वनस्पती व आपापल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमीने उपजवली; देवाने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा तिसरा दिवस.