YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 1:1-13

उत्पत्ती 1:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, “प्रकाश होवो,” आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे; आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला ‘दिवस’ व अंधकाराला ‘रात्र’ म्हटले; आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस. मग देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो, व ते जलांना दुभागणारे होवो.” असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळाखालच्या व वरच्या जलांना वेगळे केले; आणि तसे झाले. देवाने अंतराळाला ‘आकाश’ म्हटले; आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा दुसरा दिवस. मग देव बोलला, “आकाशाखालच्या जलांचा एका ठिकाणी संचय होवो, व कोरडी जमीन दृष्टीस पडो;” आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीला ‘भूमी’ म्हटले व जलांच्या संचयाला ‘समुद्र’ म्हटले; देवाने पाहिले की हे चांगले आहे. तेव्हा देव बोलला, “हिरवळ, बीज देणारी वनस्पती आणि आपापल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो;” आणि तसे झाले. हिरवळ, आपापल्यापरी बीज देणारी वनस्पती व आपापल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमीने उपजवली; देवाने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा तिसरा दिवस.

सामायिक करा
उत्पत्ती 1 वाचा

उत्पत्ती 1:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. पृथ्वी अंदाधुंद व रिकामी होती. जलाशयावर अंधकार होता, देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालत होता. देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. देवाने अंधकारापासून प्रकाश वेगळा केला. देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधकाराला “रात्र” असे नाव दिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस. देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते जलापासून जलांची विभागणी करो.” देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व अंतराळाखालच्या जलांची विभागणी केली व तसे झाले. देवाने अंतराळास आकाश असे म्हटले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा दुसरा दिवस. नंतर देव बोलला, “आकाशाखालील पाणी एकाजागी एकत्र जमा होवो व कोरडी जमीन दिसून येवो,” आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि एकत्र झालेल्या पाण्याच्या संचयास समुद्र असे म्हटले. त्याने पाहिले की हे चांगले आहे. देव बोलला, “हिरवळ, बीज देणाऱ्या वनस्पती, आणि आपआपल्या जातीप्रमाणे, ज्यात त्याचे बीज आहे अशी फळे देणारी फळझाडे, ही पृथ्वीवर येवोत.” आणि तसेच झाले. पृथ्वीने हिरवळ, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उत्पन्न केली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा तिसरा दिवस.

सामायिक करा
उत्पत्ती 1 वाचा

उत्पत्ती 1:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परमेश्वराने प्रथम आकाश व पृथ्वी निर्माण केली. आता पृथ्वी निराकार आणि रिकामी होती, खोलवर अंधार पसरला होता आणि परमेश्वराचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता. नंतर परमेश्वराने म्हटले: “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला. परमेश्वराने पाहिले की, प्रकाश चांगला आहे आणि त्यांनी अंधारापासून प्रकाश वेगळा केला. परमेश्वराने प्रकाशाला “दिवस” आणि अंधाराला “रात्र” असे नाव दिले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस. पुन्हा परमेश्वराने म्हटले, “जलाशयाच्या मध्यभागी अंतराळ होवो आणि ते जलापासून जलांची विभागणी करो.” परमेश्वराने अंतराळ निर्माण केले व अंतराळाच्या वरचे जल आणि खालचे जल अशी विभागणी केली आणि तसे घडून आले. परमेश्वराने अंतराळास “आकाश” असे नाव दिले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा दुसरा दिवस. नंतर परमेश्वराने म्हटले: “अंतराळाखालील जले एकत्र येवो व कोरडी जमीन दृष्टीस पडो” आणि तसे घडून आले. परमेश्वराने कोरड्या जमिनीस “भूमी” व जलांच्या संचयास “सागर” अशी नावे दिली. परमेश्वराने पाहिले की, हे चांगले आहे. मग परमेश्वराने म्हटले, “भूमीतून वनस्पतीचा उपज होवो: निरनिराळी रोपे व झाडे, फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणार्‍या फळझाडांचा भूमीतून उपज होवो” आणि तसे घडून आले. भूमीने वनस्पतीचा उपज केला: फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उपजविली. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा तिसरा दिवस.