गलतीकरांस पत्र 5:1-2
गलतीकरांस पत्र 5:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मोकळे केले आहे म्हणून त्यामध्ये तुम्ही टिकून राहा आणि दासपणाच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. पाहा, मी पौल तुम्हास हे सांगतो की, तुम्ही जर सुंता करून घेतली तर तुम्हास ख्रिस्ताचा उपयोग नाही.
गलतीकरांस पत्र 5:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ख्रिस्ताने स्वातंत्र्यासाठी आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यामध्ये स्थिर राहा व पुन्हा दास्यत्वाच्या जोखडाखाली सापडू नका. माझे ऐकून घ्या! मी पौल तुम्हाला सांगतो की जर तुम्ही स्वतः सुंता करून घेत असाल, तर ख्रिस्ताचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही.
गलतीकरांस पत्र 5:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. पाहा, मी पौल तुम्हांला सांगतो की, जर तुम्ही सुंता करून घेतली तर तुम्हांला ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही.
गलतीकरांस पत्र 5:1-2 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. पाहा, मी पौल तुम्हांला सांगतो की, जर तुम्ही सुंता करून घेतली, तर त्याचा अर्थ असा होतो की, ख्रिस्ताची तुम्हांला काही गरज नाही.


