गलतीकरांस पत्र 2:9-10
गलतीकरांस पत्र 2:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्यांनी मला दिलेले कृपादान ओळखून, याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ होते त्यांनी मला व बर्णबाला उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यांत सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे आणि त्यांनी सुंता झालेल्याकडे जावे. मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती; आणि मी तर त्याच गोष्टी करण्यास उत्कंठीत होतो.
गलतीकरांस पत्र 2:9-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा याकोब, केफा आणि योहान असे जे श्रेष्ठ आधारस्तंभ यांना समजले की मला कृपा प्राप्त झाली आहे, तेव्हा त्यांनी माझ्याशी व बर्णबाशी सहभागितेच्या उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. त्यांनी हे मान्य केले की आम्ही गैरयहूदीयांकडे जावे आणि त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे. त्या सर्वांनी एकच अशी विनंती केली होती की गरिबांना साहाय्य करण्याची आम्ही सतत आठवण ठेवावी आणि तीच गोष्ट करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक होतो.
गलतीकरांस पत्र 2:9-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे. मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती; आणि मी तर तीच गोष्ट करण्यास उत्कंठित होतो.
गलतीकरांस पत्र 2:9-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, पेत्र व योहान हे जे आधारस्तंभ असे मानले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आम्ही यहुदीतर लोकांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे आणि आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे. मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती आणि मला तीच गोष्ट करण्याची उत्कंठा होती.