गलतीकरांस पत्र 1:6-10
गलतीकरांस पत्र 1:6-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हास ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून, इतक्या लवकर, तुम्ही दुसर्या शुभवर्तमानाकडे वळला आहात. दुसरे कोणतेही शुभवर्तमान नाही; पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे आणि ख्रिस्ताचे शुभवर्तमान विपरीत करण्याची इच्छा असणारे असे कित्येक आहेत. तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हास सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान जर आम्ही सांगितले किंवा स्वर्गातील आलेल्या देवदूतानेही सांगितले, तरी तो शापित असो. आम्ही अगोदर सांगितले आहे तसेच आता मी पुन्हा सांगतो की, कोणी तुम्हास, जे तुम्ही स्वीकारले त्याच्यापेक्षा, निराळे शुभवर्तमान कोणी तुम्हास सांगितल्यास तो शापित असो. मी आता मनुष्याची किंवा मी देवाची मनधरणी करावयास पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतोषवीत असतो, तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.
गलतीकरांस पत्र 1:6-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मला आश्चर्य वाटते की, ज्यांनी तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत जगण्यासाठी बोलाविले, त्यांना सोडून तुम्ही इतक्या लवकर वेगळ्या शुभवार्तेकडे वळत आहात, जी खरोखर शुभवार्ता नाहीच. काही लोक उघडपणे तुम्हाला गोंधळात टाकीत आहेत आणि ख्रिस्ताच्या शुभवार्तेत बदल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु ज्या शुभवार्तेचा प्रचार आम्ही तुम्हाला केला, त्या व्यतिरिक्त जर आम्ही किंवा स्वर्गातून एखादा देवदूतसुद्धा प्रचार करीत असेल तर त्यांच्यावर परमेश्वराचा शाप येवो! जसे आम्ही पूर्वी सांगितलेले आहे, म्हणून मी आता पुन्हा सांगतो: जर कोणी तुम्हाला तुम्ही स्वीकारलेल्या शुभवार्ते व्यतिरिक्त दुसरा प्रचार करीत आहेत, तर त्यांच्यावर परमेश्वराचा शाप असो! आता मी माणसांची पसंती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे का, किंवा परमेश्वराची? किंवा मी लोकांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत आहे का? जर मी अजूनही लोकांना प्रसन्न करीत असतो तर मी ख्रिस्ताचा सेवक नसेन.
गलतीकरांस पत्र 1:6-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हांला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात; ती दुसरी नाही; पण तुम्हांला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली, किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली, तरी तो शापभ्रष्ट असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की, जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हांला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.
गलतीकरांस पत्र 1:6-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हांला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले, त्याला सोडून तुम्ही इतक्या लवकर अन्य शुभवर्तमानाकडे वळत आहात. खरे म्हणजे दुसरे शुभवर्तमान नाही, पण तुम्हांला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाचा विपर्यास करू पाहणारे असे कित्येक आहेत, म्हणून मी असे म्हणतो. परंतु जे आम्ही तुम्हांला सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान आम्ही किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितले तरी तो शापित असो! आम्ही अगोदर सांगितले, तसे आता पुन्हा सांगतो की, तुम्ही स्वीकारले त्यापेक्षा निराळे शुभवर्तमान कोणी तुम्हांला सांगितल्यास तो शापित असो! मी आता माणसाची मान्यता मिळवू पाहत आहे काय? मुळीच नाही! मला देवाची मान्यता हवी आहे. मी मनुष्यांना संतुष्ट करू पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना खुश करत राहिलो असतो, तर मी ख्रिस्ताचा सेवक नसतो.