गलतीकरांस पत्र 1:3-5
गलतीकरांस पत्र 1:3-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देव जो पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे, या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापांबद्दल, स्वतःला दिले. देवपित्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
गलतीकरांस पत्र 1:3-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो. ज्यांनी आपला परमेश्वर आणि पिता यांच्या इच्छेला अनुसरून आमच्या पापांसाठी स्वतःला दिले यासाठी की सध्याच्या दुष्ट जगापासून आम्हाला वाचवावे. त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
गलतीकरांस पत्र 1:3-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देव जो पिता त्याच्यापासून व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो. आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या-आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले. देवपित्याला1 युगानुयुग गौरव असो. आमेन.
गलतीकरांस पत्र 1:3-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त कृपा व शांती देवो. आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला अर्पण केले. परमेश्वराचा युगानुयुगे गौरव असो!