गलतीकरांस पत्र 1:2-3
गलतीकरांस पत्र 1:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
गलती प्रांतातील मंडळ्यांस; मनुष्यांकडून किंवा मनुष्यांच्याद्वारे नव्हे, तर येशू ख्रिस्ताच्याद्वारे आणि ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले तो देवपिता, ह्याच्याद्वारे झालेला प्रेषित पौल, याच्याकडून आणि माझ्या सोबतीचे सर्व बंधूकडून, देव जो पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो.
गलतीकरांस पत्र 1:2-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि माझ्याबरोबर येथे असलेले सर्व बंधू आणि भगिनी यांच्याकडून, गलातीया येथील मंडळ्यांना: परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.
गलतीकरांस पत्र 1:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
गलतीयातील मंडळ्यांना : मनुष्यांकडून नव्हे, किंवा कोणा माणसाच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठवले तो देवपिता, ह्यांच्या द्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्या-बरोबरच्या सर्व बंधूंकडून : देव जो पिता त्याच्यापासून व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.
गलतीकरांस पत्र 1:1-3 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मनुष्याकडून नव्हे किंवा कोणा माणसाद्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले तो देवपिता, ह्यांच्याद्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्याबरोबरच्या सर्व बंधूंकडून: गलतीया येथील ख्रिस्तमंडळीला आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त कृपा व शांती देवो.