YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांस पत्र 1:15-16 - Compare All Versions

गलतीकरांस पत्र 1:15-16 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पण ज्या देवाने मला आईच्या उदरापासून वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले, त्यास जेव्हा बरे वाटले की, आपल्या पुत्राला माझ्याद्वारे प्रकट करावे, म्हणजे परराष्ट्रीयांमध्ये मी त्याच्या शुभवर्तमानाची घोषणा करावी तेव्हा मी हे कोणत्याही मानवाची मसलत न घेता

गलतीकरांस पत्र 1:15-16 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परंतु जेव्हा परमेश्वराने मला माझ्या मातेच्या उदरात असतानाच निवडले आणि त्यांच्या कृपेने मला बोलाविले, त्यांना हे योग्य वाटले की त्यांच्या पुत्राला माझ्यामध्ये प्रकट करावे; यासाठी की गैरयहूदी लोकांमध्ये मी येशूंच्या शुभवार्तेची घोषणा करावी. अशी माझी त्वरित प्रतिक्रिया होती की कोणत्याही मनुष्याचा सल्ला घेऊ नये.

गलतीकरांस पत्र 1:15-16 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रकट करणे बरे वाटले, अशासाठी की, मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी; तेव्हा मानवांची2 मसलत न घेता

गलतीकरांस पत्र 1:15-16 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

परंतु देवाने जन्मापूर्वीपासून माझी निवड केली व आपल्या कृपेने मला त्याची सेवा करण्यासाठी बोलावले. मी यहुदीतर लोकांमध्ये त्याच्या पुत्राच्या शुभवर्तमानाची घोषणा करावी म्हणून जेव्हा त्याने मला त्याचा पुत्र प्रकट करून दाखवला, तेव्हा माणसांचा सल्‍ला न घेता