YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एज्रा 4:3 - Compare All Versions

एज्रा 4:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पण जरुब्बाबेल, येशूवा आणि त्यांच्या वडिलांच्या घराण्याचे प्रमुख त्यांना म्हणाले, “तुम्ही नव्हे तर इस्राएलचा देव परमेश्वर याचे मंदिर फक्त आम्हासच बांधायचे आहे. पारसाचा राजा कोरेश याची तशी आज्ञा आहे.”

सामायिक करा
एज्रा 4 IRVMAR

एज्रा 4:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पण जरूब्बाबेल, येशूआ व इतर यहूदी पुढार्‍यांनी उत्तर दिले, “तुम्हाला या कामात भाग घेता येणार नाही. पर्शियाचा राजा कोरेशच्या आज्ञेप्रमाणे याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराचे मंदिर इस्राएली लोकांनीच बांधले पाहिजे.”

सामायिक करा
एज्रा 4 MRCV

एज्रा 4:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पण जरूब्बाबेल, येशूवा व इस्राएलाच्या पितृकुळांचे इतर प्रमुख त्यांना म्हणाले, “आमच्या देवासाठी मंदिर बांधण्याच्या बाबतीत आमच्याशी तुम्हांला काही कर्तव्य नाही; तर पारसाचा राजा कोरेश ह्याच्या आज्ञेप्रमाणे आम्हीच एकत्र होऊन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर बांधणार.”

सामायिक करा
एज्रा 4 MARVBSI