एज्रा 10:5-6
एज्रा 10:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा एज्रा उठला, प्रमुख यजाक, लेवी आणि सर्व इस्राएली लोक यांच्याकडून त्यांनी त्या वचनाप्रमाणे वागावे अशी शपथ घेतली. त्यांनी वचन दिले. मग एज्रा देवाच्या मंदिराच्या समोरच्या भागातून उठून एल्याशीबाचा मुलगा यहोहानान याच्या खोलीत गेला. यहोहानाने एज्रा समोर अन्नपाण्याला स्पर्शही केला नाही. कारण तो बंदीवासातून आलेल्या अविश्वासणाऱ्यासाठी शोक करीत होता.
एज्रा 10:5-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा एज्रा उठून उभा राहिला आणि त्याने याजक, लेवी आणि सर्व इस्राएली लोकांच्या पुढार्यांनी शखन्याह म्हणतो त्याप्रमाणे करण्याची शपथ घ्यावी अशी मागणी केली आणि त्या सर्वांनी शपथ घेतली. मग एज्रा परमेश्वराच्या भवनापासून उठला व एल्याशीबाचा पुत्र यहोहानानच्या खोलीवर गेला, त्याने अन्नपाणी घेण्याचे नाकारले, कारण बंदिवासातून परत आलेल्या इस्राएलांच्या विश्वासघातासाठी तो शोक करीत राहिला.
एज्रा 10:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग एज्राने उठून याजक, लेवी व सर्व इस्राएल ह्यांच्या प्रमुख याजकांकडून शपथ वाहवली की आम्ही ह्या वचनानुसार वागू; ह्याप्रमाणे त्यांनी शपथ वाहिली. मग एज्रा देवाच्या मंदिरापुढून उठला आणि यहोहानान बिन एल्याशीब ह्याच्या कोठडीत गेला; तेथे तो गेला तेव्हा त्याने अन्नपाणी सेवन केले नाही, कारण बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकास्तव तो शोक करीत राहिला.