यहेज्केल 8:11-12
यहेज्केल 8:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा इस्राएलाच्या घराण्याचे सत्तर वडील मी पाहिले त्यामध्ये याजन्या चा मुलगा शाफान हा त्यांच्यामध्ये उभा होता, प्रत्येक मनुष्याजवळ धूप जाळण्याचे भांडे होते त्यांचा सुंगध वर घेतल्या जात होता. मग तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू पाहिलेस का इस्राएलाच्या घराण्याचे वडील अंधारात काय करतात ते? प्रत्येक मानव मूर्तीच्या गृहात लपून काय करतात, ते म्हणतात, परमेश्वर देव आम्हास बघत नाही, म्हणून परमेश्वर देवाने त्यांचा त्याग केला आहे.
यहेज्केल 8:11-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याच्यासमोर इस्राएलचे सत्तर वडील उभे होते आणि शाफानचा पुत्र याजन्याह त्यांच्यामध्ये उभा होता, प्रत्येकाच्या हातात धुपाटणे होते आणि सुगंधी धूपाचा ढग वर चढत होता. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे वडीलजन आपआपल्या मूर्तिघराच्या अंधारात काय करीत आहेत ते तू पाहिलेस काय? ते म्हणतात, ‘याहवेह आम्हाला पाहत नाही; याहवेहने आम्हाला टाकले आहे.’ ”
यहेज्केल 8:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्यांच्यापुढे इस्राएल घराण्याच्या वडिलांतले सत्तर पुरुष उभे असून त्यांच्यामध्ये याजन्या बिन शाफान हा उभा होता; त्या प्रत्येक माणसाच्या हाती धुपाटणे होते; तेथे धूपाच्या धुराचा दाट ढग वर जात होता. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएल घराण्याचा प्रत्येक वडील आपल्या मूर्तिगृहात अंधारामध्ये काय करीत आहे हे तुला दिसते ना? ते तर म्हणतात की, ‘परमेश्वर आम्हांला पाहत नाही; परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे.”’