यहेज्केल 8:1-6 - Compare All Versions
यहेज्केल 8:1-6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग बाबेलातील बंदिवासाच्या सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी मी माझ्या घरात बसलो असता यहूदाचे वडील माझ्या पुढे बसले होते, तेव्हा पुन्हा परमेश्वर देवाचा वरदहस्त माझ्यावर आला. मग मी पाहिले की मनुष्याच्या आकृतीसारखे मला दिसले, त्यांच्या कमरेच्या खाली अग्नी भासला, त्याच्या कमरेच्या वरच्या भागात चकाकणाऱ्या धातूसारखे मला दिसले. मग देवाने दाखवलेल्या दृष्टांतात हाताच्या आकृती प्रमाणे येऊन माझ्या डोक्याच्या केसास धरुन देवाच्या आत्म्याने मला स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्यभागी उचलून घेतले, त्याने मला यरूशलेमेला नेले उत्तरेच्या आतील भागाच्या वेशी जवळ तेथे एक मूर्ती चिडवण्यासाठी उभी होती. आणि इस्राएलाच्या देवाचे गौरव कायम होते, जे मी पाहिले होते. मग तो मला म्हणाला “मानवाच्या मुला, उत्तरेकडे आपली नजर लाव जी वेदीकडे जाते,” प्रवेशव्दारातही चिडवणारी मूर्ती होती. तेव्हा तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ते काय करत आहेत हे तू पाहिले काय? तेथे मोठे घृणा आणणारे कृत्ये करीत आहे, मी आपल्या पवित्र ठिकाणाहून निघून जाण्यासाठी इस्राएल घराणे करीत आहे, तुम्ही जाऊन पाहा ते मोठे घृणास्पद आहे.”
यहेज्केल 8:1-6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, जेव्हा मी माझ्या घरात बसलो होतो आणि यहूदीयाचे वडीलजन माझ्यापुढे बसले होते, तिथे सार्वभौम याहवेहचा हात माझ्यावर आला. मी पाहिले, आणि मनुष्यासारखी दिसणारी एक आकृती मला दिसली. त्याच्या कमरेसारख्या दिसणार्या भागापासून खालचा भाग अग्नीसारखा होता आणि तिथून वरच्या भागाचे रूप तेजस्वी धातूसारखे प्रज्वलित होते. हातांसारख्या दिसणार्या आकृतिसारखे त्याने काहीतरी पुढे केले व माझे डोक्याचे केस धरले. मग आत्म्याने मला पृथ्वी व आकाशाच्या दरम्यान वर उचलले आणि परमेश्वराच्या दृष्टान्तामध्ये त्याने मला यरुशलेमला, आतील अंगणाच्या उत्तरेकडील दरवाजाच्या प्रवेशाकडे नेले, जिथे ईर्षेस प्रवृत्त करणारी मूर्ती उभी होती. आणि जसे मैदानात मी पाहिले होते असेच तिथे इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव माझ्यासमोर होते. तेव्हा तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, उत्तरेकडे पाहा.” म्हणून मी पाहिले आणि वेदीच्या उत्तरेकडील द्वाराच्या प्रवेश स्थानात मला ती ईर्षेची मूर्ती दिसली. आणि तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, ते जे काही करीत आहेत ते तू पाहतोस काय; इस्राएली लोक या ठिकाणी अमंगळ गोष्टी करीत आहेत, ज्यामुळे माझ्या पवित्रस्थानातून मी दूर केला जाईन? परंतु यापेक्षाही अधिक अमंगळ गोष्टी तू पाहशील.”
यहेज्केल 8:1-6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पंचमीस असे झाले की मी आपल्या घरी बसलो होतो व यहूदाचे वडील माझ्यासमोर बसले होते. तेव्हा तेथे प्रभू परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला. मी पाहिले तेव्हा एक पुरुष असल्याचा भास मला झाला;1 त्याच्या कंबरेपासून खाली अग्नीचा भास झाला व त्याच्या कंबरेपासून वर तृणमण्याच्या तेजासारखा मला भास झाला. त्याने हाताच्या आकृतीचे काही पुढे करून माझ्या डोक्यावरील एक बट धरली आणि आत्म्याने आकाश व पृथ्वी ह्यांच्या दरम्यान मला उचलून नेऊन दिव्यदृष्टीने यरुशलेम येथे उत्तरेस असलेल्या आतल्या अंगणाच्या दरवाजाजवळ आणले; तेथे ईर्ष्येस पेटवणार्या मूर्तीचे आसन होते. मग पाहा, मी खोर्यात दृष्टान्त पाहिला होता त्यासारखे इस्राएलाच्या देवाचे तेज येत होते. तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, आपले डोळे वर करून उत्तर दिशेकडे पाहा. मी उत्तरेस दृष्टी लावली तर वेदी-वेशीच्या उत्तरेस मंदिराच्या प्रवेशमार्गात ही ईर्ष्येस पेटवणारी मूर्ती होती.” तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ते काय करीत आहेत ते पाहतोस ना? मी आपल्या पवित्रस्थानातून दूर निघून जावे म्हणून अशी अमंगळ कृत्ये इस्राएल घराणे येथे करीत आहे; ह्याहूनही अधिक अमंगळ कृत्ये तुझ्या दृष्टीस पडतील.”