YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 43:16-19

यहेज्केल 43:16-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

वेदीवरील अग्नीकुंडाची लांबी बारा हात व रुंदी बारा हात अशी चौरस होती. तिची बैठक चौदा हात लांब व चौदा हात रुंद होती. त्याची कड दीड हात रुंद होती. तिच्यासभोवती कड अर्धा हात रुंद होता. तिचा तळभाग सभोवार एक हात उंच होता. वेदीच्या पायऱ्या पूर्वेकडे होत्या.” पुढे तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, प्रभू परमेश्वर म्हणतो, या वेदीवर होमार्पण करावे व रक्त शिंपडावे म्हणून ते ती तयार करतील त्या दिवशी तिचे नियम हेच आहेत. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, माझी सेवा करावयला माझ्याजवळ येणाऱ्या लेवी वंशातला सादोक कुळातील याजक यास पापार्पणासाठी एक गोऱ्हा दे.

सामायिक करा
यहेज्केल 43 वाचा

यहेज्केल 43:16-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

वेदीचा अग्निकुंड चौरस असून तो बारा हात लांब आणि बारा हात रुंद आहे. वरील बैठक सुद्धा चौरस असून ती चौदा हात लांब आणि चौदा हात रुंद आहे. वेदीच्या चहूकडील तळभाग एक हात व त्याचा काठ अर्धा हात आहे. वेदीच्या पायर्‍या पूर्वेकडे आहेत.” तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: होमार्पणासाठी व वेदी बांधून झाल्यावर त्यावर रक्त शिंपडण्यासाठी जे नियम आहेत ते हे: सादोकच्या कुटुंबाच्या लेवी कुळातील याजकांना तुम्ही पापार्पणासाठी एक गोर्‍हा द्यावा. हे याजक माझी सेवा करण्यास माझ्यासमोर येतात, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

सामायिक करा
यहेज्केल 43 वाचा

यहेज्केल 43:16-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

वेदीचे अग्निकुंड बारा हात लांब व बारा हात रुंद होते; ते समचौरस होते. तिची बैठक चौदा हात लांब व चौदा हात रुंद अशी चौरस होती; तिच्याभोवतालचा पाटथरा अर्धा हात, आणि तिचा तळभाग सभोवार एक हात उंच होता; तिच्या पायर्‍या पूर्वाभिमुख होत्या.” तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, प्रभू परमेश्वर म्हणतो, ह्या वेदीवर होमार्पण करावे व रक्त शिंपडावे म्हणून ती बांधून काढतील. त्यानंतरच्या दिवसांचे तिच्यासंबंधीचे विधी हे : माझी सेवा करण्यास माझ्यासमीप येणार्‍या लेवी वंशातला सादोकाच्या कुळातील याजक ह्याला पापार्पण करण्यासाठी तू एक गोर्‍हा दे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.

सामायिक करा
यहेज्केल 43 वाचा