यहेज्केल 37:1-3
यहेज्केल 37:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराचा हात माझ्यावर आला, परमेश्वराच्या आत्म्याकडून मला बाहेर उचलून नेले आणि खाली दरीच्या मध्यभागी आणून ठेवले. ती हाडांनी भरलेली होती. मग त्याने मला त्यामधून गोल व गोल चालवले. पाहा! दरीत जमिनीवर पुष्कळ हाडे पडलेली होती. आणि पाहा! ती हाडे अगदी सुकलेली होती. तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही हाडे पुन्हा जिवंत होऊ शकतील का?” मग मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, फक्त तुलाच माहीत आहे.”
यहेज्केल 37:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहचा हात माझ्यावर होता आणि त्यांनी मला याहवेहच्या आत्म्याच्या द्वारे बाहेर आणले आणि खोर्याच्या मधोमध ठेवले; ते हाडांनी भरलेले होते. त्याने मला त्यातून चहूकडून फिरविले आणि मी पाहिले की खोर्याच्या भूमीवर पुष्कळ हाडे होती, ती हाडे तर शुष्क होती. याहवेहने मला विचारले, “मानवपुत्रा, ही हाडे जिवंत होतील काय?” मी म्हणालो, “सार्वभौम याहवेह, ते तर केवळ तुम्हीच जाणता.”
यहेज्केल 37:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला; आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोर्यात नेऊन ठेवले, तेथे अस्थीच अस्थी होत्या. त्याने मला त्यांच्यामधून चोहोकडून फिरवले तेव्हा पाहा, त्या खोर्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या; त्या अति शुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय?” मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक.”