यहेज्केल 24:15-18
यहेज्केल 24:15-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मानवाच्या मुला पाहा! तुझ्या डोळ्यांना जे उत्तम वाटते ते तुझ्यापासून मी काढून घेईन, तरी तू दुःख करु नये व आसवेही गाळू नये व आपली वाहने फाडू नयेत. तू मुकाट्याने खेद व्यक्त कर मृतांसाठी दुःख व्यक्त करु नको, आपल्या डोक्यात फेटा राहू दे, व पायात जोडा घाल आपले तोंड झाकू नको दुःखाच्या समयी पत्नीच्या मुत्युनंतर जे पुरुष अन्न पाठवतात ते खाऊ नको.” मग पहाटे मी माझ्या लोकांशी बोललो आणि माझी पत्नी सायंकाळी वारली. तेव्हा मला जी आज्ञा झाली तसे मी सकाळी पालन केले.
यहेज्केल 24:15-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “हे मानवपुत्रा, एका झटक्यात तुझ्या डोळ्याचा आनंद मी तुझ्यापासून काढून घेणार आहे. परंतु तू शोक करू नकोस किंवा रडू नकोस वा अश्रू गाळू नकोस. शांततेने कण्ह; मेलेल्यासाठी शोक करू नकोस. तुझा पागोटा काढू नकोस आणि आपली पायतणे पायातच असू दे; तुझे तोंड झाकू नकोस किंवा प्रथेनुसार शोक करणार्यांसाठी आणलेले अन्न तू खाऊ नकोस.” म्हणून सकाळी मी लोकांशी बोललो आणि संध्याकाळी माझी पत्नी मरण पावली. दुसर्या सकाळी मला आज्ञापिल्याप्रमाणे मी केले.
यहेज्केल 24:15-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, पाहा, मी तुझ्या नेत्रांना जे प्रिय ते सपाट्यासरशी तुझ्यापासून काढून घेतो; तरी तू शोक करणार नाहीस, रडणार नाहीस, अश्रू गाळणार नाहीस. उसासा मुकाट्याने टाक; मृतांसाठी शोक करू नकोस, डोक्याला शिरोभूषण घाल, पायांत जोडा घाल, आपले ओठ झाकू नकोस, सुतकात लोक अन्न पाठवतात ते खाऊ नकोस.” सकाळी मी लोकांत हे म्हणालो, आणि संध्याकाळी माझी बायको मेली; तेव्हा मला आज्ञा झाली होती तसे मी दुसर्या दिवशी सकाळी केले.