यहेज्केल 11:19-20
यहेज्केल 11:19-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मी तुम्हास एक मन देईन, आणि मी तुम्हात नवीन आत्मा घालीन जेव्हा ते माझ्या जवळ येतील, त्यांच्यातील दगडरुपी मन काढून त्यांना नवे मांसमय मन देईन. मग मी ठरवेन तसे ते चालतील, ते माझे फर्मान पाळतील आणि त्या प्रमाणे करतील. तर ते माझे लोक आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.
यहेज्केल 11:19-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी त्यांना अविभाजित हृदय देईन आणि त्यांच्यात नवीन आत्मा घालेन; मी त्यांच्यामधून त्यांचे दगडरुपी हृदय काढून त्यांना मांसमय हृदय देईन. तेव्हा ते माझे विधी आचरणात आणतील व काळजीपूर्वक माझे नियम पाळतील. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.
यहेज्केल 11:19-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी त्यांना एकच हृदय देईन; तुमच्यात नवीन आत्मा घालीन; मी त्यांच्या देहांतून पाषाणहृदय काढून टाकून त्यांना मांसमय हृदय देईन; म्हणजे ते माझ्या नियमांना अनुसरून चालतील; माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे वागतील; ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.