निर्गम 9:1-9
निर्गम 9:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर परमेश्वराने मोशेला फारोकडे जाऊन असे बोलण्यास सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे.’ जर तू त्यांना जाण्यापासून सतत असाच नाकारीत राहशील व जर तू त्यांना मागे ठेवून घेशील. तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे व शेरडेमेंढरांचे कळप, ही जी तुझी जनावरे रानांत आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. भयंकर मरी उद्भवेल. परंतु परमेश्वर इस्राएलाची व मिसराची गुरेढोरे यांच्यात भेद करील; इस्राएली लोकांचे एकही जनावर मरणार नाही.” याकरिता परमेश्वराने वेळही नेमलेली आहे. “या देशात उद्या हे सर्व घडून येईल.” दुसऱ्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसरमधील सर्व गुरे मरण पावली. परंतु इस्राएल लोकांच्या गुरांपैकी एकही मरण पावले नाही. फारोने बारकाईने चौकशी केली आणि पाहा, इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मरण पावले नव्हते. तरीपण फारोचे मन कठीणच राहिले. त्याने इस्राएल लोकांस जाऊ दिले नाही. नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, “मोशेने ओंजळभर भट्टीची राख घेऊन फारोदेखत आकाशाकडे उधळावी. त्या राखेचे बारीक कण सगळ्या मिसरभर पसरतील आणि त्यांच्या स्पर्शाने मनुष्यांना व पशूंना फोड येऊन गळवे येतील.”
निर्गम 9:1-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा व त्याला सांग, ‘इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात, “माझ्या लोकांना जाऊ दे, अशासाठी की त्यांनी माझी उपासना करावी.” जर तू त्यांना जाण्यास नकार दिला आणि त्यांना धरून ठेवलेस, तर शेतातील तुमची जनावरे—घोडे, गाढवे, उंट व शेळ्यामेंढ्यांचे कळप यांच्यावर याहवेहचा हात भयानक पीडा आणेल. परंतु याहवेह इस्राएलची जनावरे व इजिप्तची जनावरे यात फरक करतील, असा की इस्राएली लोकांची जनावरे मरणार नाहीत.’ ” याहवेहने समय नेमून ठेवला व म्हणाले, “याहवेह हे उद्या देशभर घडवून आणतील.” आणि दुसर्या दिवशी याहवेहने तसेच केले: इजिप्त लोकांची सर्व गुरे मरून गेली, परंतु इस्राएल लोकांच्या कळपातील एकही जनावर मेले नाही. फारोहने शोध घेतला व जाणून घेतले की इस्राएलातील एकही जनावर मेले नाही, तरीसुद्धा फारोहचे मन बदलले नाही व त्याने इस्राएली लोकांना जाऊ दिले नाही. नंतर याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, “भट्टीतून मूठभर राख घेऊन मोशेने ती फारोहच्या देखत हवेत उधळावी. व संपूर्ण इजिप्त देशभर तिचा धुरळा होईल व त्यामुळे देशातील प्रत्येक मनुष्य व पशू यांच्यावर गळवे फुटतील.”
निर्गम 9:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोकडे जाऊन सांग, ‘इब्र्यांचा देव परमेश्वर असे सांगतो की, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे. तू त्यांना जाऊ देणार नाहीस आणि त्यांना अजूनही अडवून ठेवशील, तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे, शेरडेमेंढरे ही जी तुझी जनावरे रानात आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल; भयंकर मरी उद्भवेल. इस्राएलाची गुरेढोरे आणि मिसर्यांची गुरेढोरे ह्यांच्यामध्ये परमेश्वर भेद राखील; इस्राएल लोकांचे एकही जनावर मरायचे नाही.”’ मग परमेश्वराने वेळ ठरवली आणि म्हटले, “उद्या परमेश्वर ह्या देशात ही गोष्ट करील.” दुसर्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसर देशातील सर्व जनावरे मेली; तथापि इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नाही. फारोने माणसे पाठवली तर पाहा, इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नव्हते. तथापि फारोचे मन कठीणच राहिले आणि त्याने लोकांना जाऊ दिले नाही. गळवांची पीडा नंतर परमेश्वराने मोशे आणि अहरोन ह्यांना सांगितले की, “भट्टीतली ओंजळभर राख1 घेऊन मोशेने फारोच्या समक्ष आकाशाकडे उधळावी. मग तिचा धुरळा होऊन मिसर देशभर पसरेल आणि सगळ्या मिसर देशातील माणसे व गुरे ह्यांना त्यामुळे फोड येऊन गळवे होतील.”