निर्गम 5:8-9
निर्गम 5:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तरी पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनवल्या पाहिजेत. त्यामध्ये काही कमी करून स्वीकारू नका. कारण ते आळशी झाले आहेत. म्हणूनच ते ओरड करून म्हणतात, आम्हांला जाण्याची परवानगी दे आणि आमच्या देवाला यज्ञ करू दे. तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.”
निर्गम 5:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तरीही पूर्वी ते जितक्या विटा तयार करीत होते तितक्या त्यांनी केल्याच पाहिजे; त्यात घट होऊ नये. ते आळशी आहेत; म्हणूनच, ‘आम्हाला रानात जाऊन आमच्या परमेश्वराला यज्ञ करू दे,’ अशी ओरड करीत आहेत. त्यांच्यासाठी काम अजून कठीण करा, म्हणजे ते काम करत राहतील व खोट्या गोष्टींकडे ते लक्ष देणार नाहीत.”
निर्गम 5:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तरी आजवर जेवढ्या विटा त्यांना कराव्या लागत होत्या तेवढ्या त्यांच्याकडून करवून घ्या, त्यात काही कमी करू नका; ते आळशी आहेत, म्हणून ते ओरड करीत आहेत की आम्हांला जाऊ द्या, आमच्या देवाला यज्ञ करू द्या. त्या लोकांवर अधिक काम लादा, म्हणजे त्यांच्यावर कामाचा बोजा पडून ते ह्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.”